
अनिल मदने
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/ जत:
मौजे अचकनहळळी येथील श्री विनायक परशुराम शिंदे हे सकाळी रानात पेरण्यासाठी गेले होते.येताना सायंकाळी शेतानजीक असलेल्या ओढ्याला पूर आला.ओढा ओलांडताना एक बैलगाडी पुढे गेली होती.त्यानंतर श्री विनायक शिंदे याने आपली गाडी पाण्यात घातली असता वरून पाण्याचा प्रवाह एकदम वाढला.त्यामुळे गाडी वाहून जाऊ लागली. पुढे गाडी वाहून गेल्यानंतर बैलांसह गाडी गेली.त्यामुळे सदर शेतकऱ्याचे एक बैलजोडीचे नुसकान झाले.नंतर गावातील,शहरातील लोकांनी येऊन, तलाठ्यांनी चर्चा करून पंचनामा करण्यात आला.
अशावेळी कामगार सेनेचे शाखाप्रमुख श्री अर्जुन भोसले यांनी दिनकर पतंगे यांना कल्पना दिली.नंतर ते व चैतन्य कोरे डफळापुर विभाग प्रमुख दत्तात्रेय कोरे उपविभाग प्रमुख सुरेश घोडके महाराष्ट्र कामगार सेना तालुकाप्रमुख तसेच रामदेव मिसाळ सुनील कोरे उपशाखाप्रमुख मिरवाड व इतर शेतकरी यांच्याशी चर्चा करून तहसीलदार यांना भेटून शेतकऱ्यांचे झालेले नुकसान भरपाई रुपये एक लाख वीस हजार इतकी रक्कम मागणी केली व निवेदन दिले. महाराष्ट्र कामगार सेनेकडून संकटात सापडलेल्या शेतकऱ्याला दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे,असे मत दिनकर पतंगे यांनी सांगितले. यापुढेही संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना अशाच प्रकारे सहकार्य करू असे सांगितले.


संबंधित बातम्या
प्रवीण बागड़े यांना माफसूचा उत्कृष्ट अधिकारी पुरस्कार प्रदान
कुसमोड येथील कैलास घोंगडे या शेतकऱ्याच्या गाईवर तरसाच्या हल्लयात गाईचा मृत्यू
येळावीत रक्तदान शिबिरास युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद