
मोहनराव पुजारी
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/ आटपाडी:
आटपाडी तालुक्यात पावसाची संततधार चालूच असून अतिवृष्टीमुळे अनेक दुर्घटना घडू लागल्या आहेत. आटपाडी तालुक्यातील नागरिकांनी सुरक्षित व सतर्क रहावे,असे आवाहन युवा सेनेचे तालुकाध्यक्ष पैलवान संतोष पुजारी यांनी नागरिकांना केले आहे.
आवाहन करताना पैलवान संतोष पुजारी म्हणाले, सध्या वादळी वाऱ्यासह पाऊस सुरू आहे. अतिवृष्टीमुळे जुनी जीर्ण झालेली धाब्याची घरे कोसळू लागली आहेत. जुन्या भिंती पडण्याची शक्यता नाकारता येत नसल्यामुळे ज्यांची अशी घरे आहेत,त्यांनी सुरक्षित ठिकाणी रहावे.
ज्यांच्याकडे शेततळी आहेत,त्यांनी शेततळ्यांमधील पाणी सायपन करून कमी करावे किंवा सोडून द्यावे. पाणीसाठा वाढल्यामुळे दलदलीच्या परिस्थितीत शेततळी फुटू लागल्याच्या घटना घडू लागल्या आहेत. त्यामुळे त्यातील अतिरिक्त पाण्याची विल्हेवाट लावावी. पाऊसमान वाढण्याची शक्यता असून रात्री-अपरात्री गैरप्रकार घडल्यास तद्नंतर कोणतीही उपाययोजना करता येणार नाही. त्यामुळे आटपाडी तालुक्यातील सर्व नागरिकांनी सतर्क राहून योग्य ते खबरदारीचे उपाय करावेत,असे आवाहन पुजारी केले आहे.

संबंधित बातम्या
प्रवीण बागड़े यांना माफसूचा उत्कृष्ट अधिकारी पुरस्कार प्रदान
कुसमोड येथील कैलास घोंगडे या शेतकऱ्याच्या गाईवर तरसाच्या हल्लयात गाईचा मृत्यू
येळावीत रक्तदान शिबिरास युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद