
गुरुनाथ तिरपणकर
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/बदलापुर:
जवळपास चार लाख लोकसंख्येचे बदलापुर शहर आणि येथे नागरीकांच्या प्रवासाचे एकमेव साधन म्हणजे ट्रेन. सध्या ट्रेन देखील बंद आहेत.यामुळे जेष्ठ नागरीक,रोजंदारीवर काम करणारे कामगार,महिला व इतर नोकरदार वर्ग यांना ट्रेनमधुन प्रवास करणे शक्य होत नाही.या शहरातील नागरीक दररोज नोकरीसाठी पनवेल,ठाणे,वाशी,महापे,तुर्भे,नवी मुंबई या उपनगरातील परिसरांमधील एम.आय.डी.सी.व आय.टी.कंपन्यांमध्ये हजारोंच्या संख्येने ये-जा करत असतात. त्यामुळे या शहरातील लोकांना परिवहन सेवेची अत्यंत गरज आहे.व बदलापुर शहर प्रवासी संघटना याची सातत्याने मागणी करत आहे.त्याच अनुषंगाने कुळगांव-बदलापुर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी दीपक पुजारी यांना बदलापुर शहरात काॅन्ट्रॅक पध्दतीवर परिवहन सेवा सुरु करण्यासंदर्भात अध्यक्ष सुधाकर पतंगराव यांच्या नेतृत्वाखाली बदलापुर शहर प्रवासी संघटनेकडून निवेदन सादर करण्यात आले.व सविस्तर चर्चा करण्यात आली.सुधाकर पतंगराव यांनी पनवेल, ठाणे, डोंबिवली, अंबरनाथ,वाशी,महापे,नवी मुंबई या मार्गावर कशाप्रकारे परिवहन सेवा सुरु करता येईल मुद्देसुद,उदाहरणादाखल सविस्तर माहिती दीली.सुहास सावंत यांनी बसचा रींगरुट,परिवहन सेवेतील फायदे-तोटे,सेवा देण गरजेचं आहे. याच उत्कृष्ट विश्लेषण केले.दिलीप नारकर,दीपक वांयगणकर यांनी खोपोली नगरपरिषदेतील परिवहन सेवेचे उदाहरण दीले.तसेच मुंबईत बेस्ट च्या मिनी बसेस काॅन्ट्रॅक बेसिसवर कशा चालत आहेत याचही मुल्यमापन सादर केले. बदलापुर गृहनिर्माण सोसायटी महासंघाचे अध्यक्ष सुनिल दळवी यांनीही आपले विचार मांडले. तसेच महेश सावंत, किशोर गुरव,सुनिल देशमुख, शरद कदम,एकनाथ गायकर यांनीही चर्चेत सहभाग घेतला.तसेच नगरपरिषदेचे इंजिनिअर आर.एम.बोरकर यांचेही मार्गदर्शन लाभले.चर्चेअंती मुख्याधिकारी दीपक पुजारी यांनी कल्याण-डोंबिवली महानगरपालिका, पनवेल महानगरपालिका, नवी मुंबई महानगरपालिका यांच्या आयुक्तांना व परिवहन व्यवस्थापकांना बदलापुरकरांसाठी परिवहन सेवा उपलब्ध व्हावी.तेथुन बस सुरु करण्यासंदर्भात पत्र व्यवहार करण्यात येईल,व प्रत्यक्ष भेट घेऊन चर्चा करण्यात येईल, असे प्रवासी संघटनेच्या शिष्टमंडळास आश्वस्त केले.

संबंधित बातम्या
प्रवीण बागड़े यांना माफसूचा उत्कृष्ट अधिकारी पुरस्कार प्रदान
कुसमोड येथील कैलास घोंगडे या शेतकऱ्याच्या गाईवर तरसाच्या हल्लयात गाईचा मृत्यू
येळावीत रक्तदान शिबिरास युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद