सोलापूर जिल्यातील हुलजंती येथून एलसीबी पथकाने केले अटक

अनिल मदने
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/जत:
कंठी (ता.जत) येथील धनाजी नामदेव मोटे (वय 43) याचा अनैतिक संबंधातून निर्घृण खून करण्यात आला. ही घटना गुरुवारी दि.8 रोजी रात्री घडली. खून प्रकरणी चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यापैकी मुख्य आरोपी नागेश भीमा लांडगे यास दि.9 रोजी अटक करून 14 ऑक्टोबर पर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे. तर अन्य तिघे संशयित अद्याप फरारी होते. या तिघांच्या अटकेसाठी तीन पथके वेगवेगळ्या भागात रवाना झाली होती. त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पथकाने दोन दिवसात या गुन्ह्यातील मुख्य आरोपी नागा ऊर्फ नागेश भिमराव लांडगे, गोविंद नागेश लांडगे, मुरलीधर मधुकर वाघमारे, श्रीधर मधुकर वाघमारे (सर्व रा.कंठी ता.जत) यांना मंगळवेढा तालुक्यातील हुलजंती येथून ताब्यात घेण्यात आला आहे. त्यांना ताब्यात घेवून त्यांचेकडे कंठी येथे झालेल्या गुन्ह्याच्या अनुषंगाने चौकशी केली असता, या आरोपींनी गुन्ह्याची कबूली दिली आहे.
ही कारवाई पोलीस निरीक्षक श्रीकांत पिंगळे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रविण शिंदे, अभिजित सावंत, पोलीस हवालदार जितेंद्र जाधव, राजाराम मुळे, राजू शिरोलकर, संदीप गुरव, संदीप पाटील, आमसिध्द खोत, संदीप नलवडे, अनिल कोळेकर, शंकर पाटील ,अरुण सोकटे यांनी केली.

संबंधित बातम्या
मटण खायला घालत नाही म्हणून मुलाने केला बापाचा खून
कॅम्पमध्ये गुन्हेगाराचा खून
पिलीव गावात एकाच रात्री चार घरफोड्या