आटपाडी तालुका प्राथमिक शिक्षक संघ थोरात गट महिला आघाडीचा अभिनव उपक्रम

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/आटपाडी:

आटपाडी तालुक्यातील माणुसकीला साद उपक्रमाला साद घालत आटपाडी तालुका प्राथमिक शिक्षक संघ थोरात गटाच्या महिला आघाडीने अभिनव उपक्रम हाती घेऊन स्वतः पुढाकार घेऊन ग्रामीण रुग्णालय आटपाडी येथे महिला शिक्षकांच्या माध्यमातून एक पॅरामॉनिटर मशीन लोकार्पण केली.

महिलांनी स्वतः पुढाकार घेऊन जवळ जवळ 45000 रूपये जमा करून नारी शक्ती दाखवून दिली.सामाजिक उपक्रमात महिलाही काही कमी नाही हे दाखवून दिले. आटपाडी तालुक्यातील महिला शिक्षिकांनी सक्षमपणे पुढे येऊन केलेले काम जिल्ह्य़ालाच नव्हे तर महाराष्ट्रात देखील दिशादर्शक ठरणार आहे.
या लोकार्पण सोहळ्यासाठी आटपाडी तालुका प्राथमिक शिक्षक संघ थोरात गट महिला आघाडीच्या अध्यक्षा मंगल राजमाने, माजी अध्यक्षा कल्पना बाबर, तालुका नेते सुवर्णा पाटील, संगिता हसबे, सरचिटणीस माधुरी दिवटे, कोषाध्यक्ष रूपाली चांडवले, तालुका प्रवक्त्या साधना चव्हाण, सुमन खोत इ कार्यकारिणीसह इतर महिला केंद्र संघटक उपस्थित होत्या.

या कामासाठी जिल्हा परिषद सदस्य अरुण बालटे साहेब, आटपाडी ग्राम पंचायत सदस्य दत्तात्रय पाटील, य पा वाडी गावचे प्रसिद्ध गलाई व्यावसायिक व सामाजिक कार्यकर्ते शंकर बापु चव्हाण, तरुण भारत पत्रकार सुरज मुल्ला,तालुका नेते विजय राजमाने, जिल्हा उपाध्यक्ष रसिक सपाटे, तालुकाध्यक्ष असिफ मुजावर, युवराज चांडवले, राहूल बाबर, सुहास नवले यांचे विशेष मार्गदर्शन व सहकार्य मिळाले.