
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/देवराष्ट्रे:
वंचित बहुजन आघाडीचे कडेगाव निमंत्रक डॉ.राजेश साठे यांचा वाढदिवस आण्णा भाऊ साठे युथ फौंडेशनच्या वतीने साजरा करताना डॉ.आंबेडकरनगर, यशवंतनगर, साठेनगर परिसरातील शालेय विद्यार्थ्यांना वहीपेन वाटप उपक्रम राबविण्यात आला.
कोरोनाच्या संकटामुळे शाळा बंद असून ऑनलाईन शिक्षण वर्ग चालू आहेत, विद्यार्थी व पालक आर्थिक टंचाईत असताना हारतुरे व केक याला फाटा देत आण्णा भाऊ साठे युथ फौंडेशनने वही पेन वाटप करत डॉ. राजेश साठे यांचा वाढदिवस साजरा केलेने परिसरातील विद्यार्थी व पालकांनी या उपक्रमाचे खूप कौतुक केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिक्षक रमेश मिसाळ यांनी केले, यावेळी माजी ग्रा. प. सदस्य अशोक मिसाळ, वंचितचे युवक जिल्हाध्यक्ष राजेश गायगवाळे, भाजप युवा मोर्च्याचे प्रल्हाद मिसाळ, अमोल गायगवाळे, गणेश साठे यासह आण्णा भाऊ साठे युथ फौंडेशनचे कार्यकर्ते उपस्थित होते.

संबंधित बातम्या
प्रवीण बागड़े यांना माफसूचा उत्कृष्ट अधिकारी पुरस्कार प्रदान
कुसमोड येथील कैलास घोंगडे या शेतकऱ्याच्या गाईवर तरसाच्या हल्लयात गाईचा मृत्यू
येळावीत रक्तदान शिबिरास युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद