
पोपट वाघमारे
दिघंची/ प्रतिनिधी:
धनगर समाज अनेक वर्षे आरक्षण मागत आहे .माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्या कॅबिनेटमध्ये आरक्षण देतो असे म्हणाले होते, पण भारतीय जनता पार्टीने धनगर समाजाला फसवले आहे, असा घणाघात वरकुटे मलवडी येथील बाबाराजे हुलगे यांनी केला आहे.
महाविकास आघाडी सरकारने धनगर आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करावे.जोपर्यंत धनगर समाज शांत आहे तोपर्यंत आरक्षण द्या.धनगर आणि धनगड हा प्रश्न सोडवून समाजातील युवकांना न्याय मिळाला पाहिजे धनगर आणि धनगड या शब्दाचा चुकीचा अर्थ लावून समाजाची फसवणूक अनेक वर्षे झाली आहे. लवकर अंमलबजावणी केली नाही तर सरकारच्या कोणत्याही मंत्र्यांना पश्र्चिम महाराष्ट्रात फिरकू देणार नाही, असा इशारा बाबाराजे हुलगे यांनी दिला आहे.
गेल्या तीन महिन्यांत माजी केंद्रीय कृषीमंत्री शरदचंद्र पवार यांना बाबाराजे हुलगे यांनी रक्तरंजीत पत्र लिहून उत्तम जानकर व प्रभाकर देशमुख यांना विधान परीषदेवर घ्या म्हणजे धनगरांच्या समस्या सोडवतील असे पत्र लिहिले होते.

संबंधित बातम्या
प्रवीण बागड़े यांना माफसूचा उत्कृष्ट अधिकारी पुरस्कार प्रदान
कुसमोड येथील कैलास घोंगडे या शेतकऱ्याच्या गाईवर तरसाच्या हल्लयात गाईचा मृत्यू
येळावीत रक्तदान शिबिरास युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद