
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/पुणे:
जोंधळे चौक कुमठेकर रस्त्यावरील अनिल अगावणे संचालित पुणे महानगरपालिका सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने उत्तरप्रदेश मधील हाथरसमध्ये तरुणीवर झालेल्या क्रूर अत्याचाराचा जाहीर निषेध करून भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. याप्रसंगी महापालिका सार्वजनिक वाचनालयाचे संस्थापक अध्यक्ष अनिल अगावणे यांनी अत्याचार केलेल्या नराधमांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे. सरकारने आरोपींना पाठीशी न घालता स्त्रीयांवर होणाऱ्या अशा प्रकारच्या घटना रोखण्यासाठी कठोर पावले उचलली पाहिजेत. त्याशिवाय अशा नराधमांना कायद्याचा चाप बसणार नाही. यासाठी कायद्यामध्ये अशा प्रकारे अत्याचार करणाऱ्यांना डॉक्टरांचा रिपोर्ट आल्यानंतर ताबडतोब फाशीची शिक्षा दिली पाहिजे. त्यासाठी कायदा होणे ही खरी आजच्या काळाची गरज आहे. कारण लंकेतल्या रावणाने सीतेला स्पर्शही केला नव्हता, असे रामायणाची कथा सांगते. इथे तथाकथित रामाच्या व लोकशाहीच्या राज्यातच आजची सीता सुरक्षित नाही. त्यामुळे वारंवार घडणाऱ्या अशा प्रकारच्या घटनांना रोखण्यासाठी व स्त्रियांना सुरक्षा मिळण्यासाठी या नराधमांना फाशी झालीच पाहिजे. शोकसभेचे आयोजन सार्वजनिक महापालिका वाचनालयाचे सचिव विशेष कार्यकारी अधिकारी ललितकुमार अगावणे यांनी केले होते. या वेळी राजू नानेकर, सुरेश काळे, शितल दळवी, सचिन गांजवे, राहुल वंदेकर, सुरेश दळवी आदी मान्यवर, वाचक वर्ग व स्थानिक नागरिक उपस्थित होते.

संबंधित बातम्या
गलाई बांधवच माणदेशाच्या आर्थिक विकासाचा कणा
तळेवाडी-आटपाडीच्या भाऊ-बहिणीची गरुडभरारी !
‘गाव लय भारी’!