माजी मंत्री प्रा.राम शिंदे यांची आटपाडी पश्चिम भागाला सदिच्छा भेट

आटपाडी/प्रतिनिधी:

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे वंशज व महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री प्रा.राम शिंदे यांनी आयकर आयुक्त डॉ.सचिन मोटे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. यावेळी सत्कार करताना आयकर आयुक्त डॉ.सचिन मोटे आणि युवानायक अनिलशेठ पाटील,प्रा.एन.पी.खरजे,विनायकराव मासाळ, बंडूशेठ कातुरे, दादासाहेब कचरे,गोल्डमॅन अक्षय अर्जुन, राजू अर्जुन, विनोद पवार, विभूतवाडी पोलीस पाटील संजय थोरात, सुखदेव खताळ, सागर चवरे, विभूतवाडी ग्रा.पं.सदस्य राहूल मोटे, जितेंद्र भानुसे, विजय अनिसे, अभिजीत पाटील, सागर पाटील, स्वप्नील पावणे, सिद्धनाथ साळुंखे आणि सर्व युवा मित्र उपस्थित होते.
या बैठकी दरम्यान विविध सामाजिक व शैक्षणिक विषयावर चर्चा झाली. विभूतवाडी व परिसरातील नवतरूणांना शेतीपूरक व्यवसायाला व लघुउद्योगांना वेगवेगळ्या योजना आणण्यासाठी व राबविण्यासाठी प्रा.राम शिंदे यांनी सविस्तर माहिती दिली व चर्चा केली. यावेळी नवतरूणांना आपल्या विभागात प्रथमच आनंददायी वातावरण बघायला मिळाले.