कवठेमहंकाळमध्ये धनगर जमातीचे ‘ढोल बजाव,सरकार जगावो’ आंदोलन

कवठेमहांकाळ/प्रतिनिधी:
धनगर आरक्षण समन्वय समितीच्या वतीने आज तहसीलदार कार्यालय कवठेमंकाळच्या समोर “ढोल बजाव,सरकार जगावो” हे आंदोलन करण्यात आले. गेली सत्तर वर्षे घटनेत तरतूद असूनसुद्धा धनगर समाजाला एसटी चे आरक्षणाची अंमलबजावणी केली गेली नाही, तरी सरकारला धनगर आरक्षण प्रश्नांची जाणीव व्हावी,म्हणून हे आंदोलन करण्यात आले. नायब तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी सरकारने लवकरात लवकर एसटी चा दाखला द्यावा, धनगर समाजाचे हायकोर्टमध्ये जी केस चालू आहे,त्यासाठी चांगल्या वकिलाची सरकारने नेमणूक करावी व याचिका जलदगती न्यायालयात चालवावी, मागील सरकारने जाहीर केलेली एक हजार कोटी द्यावेत व आदिवासीच्या इतर सवलती द्याव्यात अशी प्रा.शिवाजी ओलेकर यांनी मागणी केली.
यावेळी पंचायत समितीचे सभापती विकास हक्के, सुभाष खांडेकर,सूर्यकांत ओलेकर,गणपती मासाळ,तानाजी शिंगाडे,सुरेश घागरे, युवराज घागरे,नारायण बंडगर,ज्ञानेश्वर खामकर,अॅड.बंडगर, हाक्के वकील,आबा बंडगर,इत्यादि उपस्थित होते.