धनगर जमातीचे आरक्षणासाठी माळशिरसमध्ये ‘ढोल बजाओ..’ आंदोलन!

संजय हुलगे
माळशिरस/प्रतिनिधी:

गेल्या अनेक वर्षापासून धनगर जमातींना अनुसूचित जमातीच्या सवलती लागू करावे व आरक्षण तात्काळ लागू करावे यासाठी समाज वेळोवेळी रस्त्यावर आलेला आहे,न्यायालयात गेलेला आहे.परंतु प्रत्येक सत्ताधारी हा धनगर जमातीच्या मागण्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून झोपेचे सोंग घेत आहे आणि या झोपलेल्या सरकारला जागे करण्यासाठी सकल धनगर समाज तालुका माळशिरसच्या वतीने आज तहसील कार्यालय माळशिरस येथे ढोल बजावे आंदोलन करण्यात आले आहे.
संविधानामध्ये धनगर जमातीतील अनुसूचित जातीच्या ३६ व्या क्रमांकावर अनुसूचित जातीचे आरक्षण लागू असताना सुद्धा प्रत्यक्षात त्याची पायमल्ली करून घटनेचा अपमान करत आहे. त्यामुळे समाज अनेक वर्षांपासून शैक्षणिक सामाजिक आणि राजकीय सुविधांपासून कोसो दूर गेलेला आहे. समाजाच्या अनेक पिढ्या बरबाद झाल्या असून प्रत्येक सत्ताधारी हे समाजाच्या मागणीकडे कानाडोळा करीत आहेत असे निवेदनात म्हटले आहे . यावेळी बाळासाहेब सरगर ,सुरेश भाऊ टेळे ,नागेश वाघमोडे ,सोपान काका नारनवर ,बाळासाहेब वावरे ,संजय देशमुख,पांडुरंग वाघमोडे, शिवराज पुकळे,डॉ.दत्तात्रय सर्जे,अजित बोरकर,दादासाहेब हुलगे,मच्छिंद्र गोरड ,रामदास कचरे सह तालुक्यातील समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.