धनगर आरक्षणप्रश्नी जत येथे ‘ढोल बजाओ सरकार जगाओ आंदोलन’

अनिल मदने
जत/प्रतिनिधी:

धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण द्यावे या मागणीसाठी व शासनाला जाग आणण्यासाठी तहसील कार्यालयासमोर “ढोल बजाओ, सरकार जगाओ’ आंदोलन करण्यात आले.यावेळी ढोल वाजवत आंदोलन करण्यात आले.आंदोलनाचे नेतृत्व युवक नेते लक्ष्मण जखगोंड यांनी केले.आरक्षण मागणीचे निवेदन नायब तहसीलदार माळी यांना देण्यात आले.
     यावेळी  युवक नेते लक्ष्मण जखगोंड म्हणाले की,  धनगर समाजाला घटनेत तरतूद असूनही  गेली ७० वर्षे  अनुसूचित जमातीच्या अनेक सवलतीपासून वंचीत ठेवले गेले.त्यामुळे अनेकांचे नुकसान झाले.लिंगायत समाजाचा या आरक्षणाला पाठींबा असून धनगर आरक्षणाबाबत समाजाच्या भावना तीव्र आहेत. तरी राज्य शासनाने त्वरित अध्यादेश  काढून अनुसूचित जमातीचे आरक्षण द्यावे.यावेळी युवक नेते अनिल पाटील  म्हणाले की,  धनगर समाजाच्या आरक्षणप्रश्नी ‘ढोल बजाओ, सरकार जगाओ’ या आंदोलनाला लिंगायत समाज्याचा  जाहीर पाठिंबा आहे.यावेळी तेजस्विनी व्हनमाने,अविनाश तुराई, भाऊसाहेब दुधाळ,धनाजी पाटील, काशीनाथ पाटील,विनायक गोरे, राजेंद्र खांडेकर व  प्रवीण पुजारी आदी उपस्थित होते.