
संजय हुलगे
माळशिरस /प्रतिनिधी:
तालुक्यातील काही गावामध्ये ढगफुटी होऊन अचानक आलेल्या पाण्याने अनेकांचे घरेदारे वाहून जाऊन संसार उघड्यावर आले होते. त्यामध्ये जीवनवश्यक वस्तू पाण्यत वाहून गेल्या होत्या. लोकांना खाण्यासाठी काहीही उरले नव्हते. त्याची पाहणी करून सामाजिक बांधिलकी जपत मदतीचा हात देऊन भाजपाचे जिल्हाचे नेते के. के. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली के .के. पाटील मित्र मंडळाच्या वतीने मळोली, दसूर, तोडले बोडले, पिलीव. कोळेगाव, फळवणी या गावातील 500 पीडित कुटुंबांना जीवनावश्यक वस्तू कीट देऊन आधार देण्यचे काम केले. त्यांच्या झालेल्या नुकसान भरपाईसाठी वरिष्ठ बोलून प्रयत्न केला जाईल असे सांगून जनतेला दिलासा देण्याचे काम केले आहे.
या वेळी भाजपा जेष्ठ नेते के के पाटील, मळोली सरपंच गणेश पाटील, फळवणी सरपंच सचिन पाटील ,तोडले सरपंच विजय माने देशमुख, राहूल मदने, बलभीम जाधव, आदिकराव सावंत ,तानाजी जाधव, जबर आतार, कैलास दुपडे, शिवराज पुकळे, मारूती मगर, मिनीनाथ मगर, अजित कोडग, नारायण पारसे आदी उपस्थित होते.
अनेक गावातील ओढ्याला अचानक आलेल्या पाण्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली मागील आठवड्यात पावसाची संततधार सुरू होती. घरांमधील असणारे संसारोपयोगी भांडी कपडे सर्व पाण्यामध्ये वाहून गेलेली आहे. अनेकांचे संसार उघड्यावर पडलेले आहेत. घरच्याघरे वाहून गेलेली आहेत. त्यामधील अनेकांचे संसार उपयोगी सामान वाहून गेलेले आहे. अनेकांच्या घरांमध्ये पाणी शिरून संसार उपयोगी सामानाची नासधूस झालेली आहे. कितीतरी लोकांची गुरांसाठी ठेवलेली वैरण, सरपण हे सर्व वाहून गेलेले आहे.मळोली येथे तर गावाच्या पाण्याच्या टाकीजवळ कोळी वस्ती आहे त्यांच्या सर्व घरांमध्ये पाणी शिरले आहे त्या परिसरातील 2 ते 3 घरे वाहून गेलेले आहेत गावाला पाणीपुरवठा करणारी विहिरीच्या कडेला असलेले कंपाऊंड सुद्धा जमीनदोस्त झालेली आहे त्या परिसरातील दोन एम एस सी बी चे डीपी ही जमीनीवर तारे सह पडलेले आहेत त्यामुळे मळोली गाव संपूर्ण अंधारामध्ये होते. भाजपा जेष्ठ नेते के के पाटील व त्याचा मित्र परिवार परिस्थितीचे गांभीर्य ओळखून तत्परता दाखवून जनतेला आजची खरी गरज जीवनावश्यक वस्तूची आहे .

संबंधित बातम्या
प्रवीण बागड़े यांना माफसूचा उत्कृष्ट अधिकारी पुरस्कार प्रदान
कुसमोड येथील कैलास घोंगडे या शेतकऱ्याच्या गाईवर तरसाच्या हल्लयात गाईचा मृत्यू
येळावीत रक्तदान शिबिरास युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद