
मोहनराव पुजारी
आटपाडी/ प्रतिनिधी:
अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांचे, फळबागांचे व पडझड झालेल्या घरांचे पंचनामे करून तातडीने मदत मिळण्याबाबतची मागणी आटपाडी तालुका वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष साहेबराव चंदनशिवे यांनी निवेदनाद्वारे आटपाडीचे तहसीलदार यांच्याकडे केली आहे.
यावेळी शैलेंद्र ऐवळे,दयानंद ऐवळे,अाबासाहेब काटे, भिकाजी खरात,सिद्धेश्वर सावंत,आशिष बनसोडे आदि कार्यकर्ते उपस्थित होते.
निवेदनात म्हटले आहे की,आटपाडी तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे खरीप पिकांचे व फळबागांचे अतोनात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेली पिके व फळबागा हातातून निघून गेल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडलेला आहे.तसेच घरांचीही मोठ्या प्रमाणात पडझड होऊन नुकसान झाले आहे.शासनाने तात्काळ पंचनामे करून आपत्कालीन निधीतून शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी ६० हजार रुपये व पडझड झालेल्या घरांसाठी ६० हजार रुपये नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.

संबंधित बातम्या
आटपाडी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये डाळिंब व्यापारी पॅक हाऊसचे उद्घाटन
शेतकरी प्रथम प्रकल्पांतर्गत शेळीपालनावर प्रशिक्षण वर्ग संपन्न
जांभुळणी येथे आज पीक-पाणी व्यवस्थापन कार्यशाळा