रोहितदादांची कोरोनावर मात करून धडाकेबाज कार्यास पुन्हा दमदार सुरुवात!

लोककार्यासाठी पुन्हा सज्ज: युवा नेते रोहितदादा देशमुख

लोकनेते धोंडीसाहेब देशमुख यांच्या समृद्ध कार्याचा वसा जपण्याचे स्वप्न उरी बाळगून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व तालुकाध्यक्ष हणमंतराव देशमुख यांच्या पावलांवर पावले टाकत समाजकार्याचा ध्यास घेतलेले युवा नेते रोहितदादा हणमंतराव देशमुख, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष  नामदार जयंतरावजी पाटील  यांच्या संकटकालीन मदतीच्या आज्ञेचे कार्यपालन करीत कोरोना प्रादुर्भावाच्या काळात अविरतपणे झटले.सामाजिक कार्याच्या व्यापातून त्यांना नकळतपणे कोरोनाने गाठले.पण त्यावर यशस्वी मात करीत रोहितदादांनी कोरोना योद्धा म्हणून पुन्हा आपल्या दमदार कार्याला धडाकेबाज सुरुवात केली आहे.
रोहित दादांना लोकनेते धोंडीसाहेब देशमुख यांच्या आदर्श सामाजिक कार्याचा वसा व वारसा आहे.राष्ट्रवादीचे नेते व तालुकाध्यक्ष हणमंतराव देशमुख यांचे अचूक सामाजिक कार्याचे मार्गदर्शन आहे.या दोन्ही गोष्टीच्या बळावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ध्येय-धोरणाप्रमाणे परिसरातील सामाजिक विकासाचे कर्तव्य पालन करण्यासाठी युवा नेते रोहितदादा प्रामाणिकपणे सतत प्रयत्नशील आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील साहेब यांच्या मार्गदर्शक आज्ञेचे पालन करून त्यांनी आटपाडी तालुक्यात कोरोना प्रादुर्भावाच्या काळात गोरगरीब जनतेच्या बंद पडलेल्या चुली पेटवण्यासाठी जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करून त्यांना आर्थिक व मानसिक आधार दिला. परगावाहून आलेल्या मजुरांना लॉकडाउन काळात उपासमारीला सामोरे जात असताना अन्नदान केले,निवारा दिला.
तालुक्यातील ग्रामपंचायत तसेच पाणीपुरवठा कर्मचारी व एन यु जे महाराष्ट्राच्या पत्रकार सदस्यांचा  विमा उतरविला.त्यांना जीवनावश्यक वस्तूंची मदत केली. तालुक्यातील अनेक गरजू, उपेक्षित घटकांना मास्क, सॅनीटायझर, आर्सेनिक अल्बमच्या गोळ्याचे वाटप, रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्याबरोबरच नैतिक आधार देऊन कोरोनाविरुद्ध लढण्याचे बळ निर्माण केले. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता समाजोपयोगी व विधायक कार्यात स्वतःला झोकून देऊन ‘कोरोना योद्धा’ म्हणून लढत असतानाच समाज संपर्कामुळे नकळतपणे त्यांनाही कोरोनाने स्पर्श केला.परंतु त्यावर मात करीत त्यांनी आता आपल्या दैदिप्यमान, धडाकेबाज कार्यास पुन्हा दमदारपणे सुरुवात केली आहे.
ते पुन्हा नव्या जोमाने,नव्या ऊर्मीने समाजकार्यासाठी पुढे येत आहेत.त्यांच्या भविष्यकालीन वाटचालीस व कार्यास अनंत कोटी शुभेच्छा!