आटपाडीत प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने ग्रामीण रुग्णालयात ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर मशीन भेट

आटपाडी/ प्रतिनिधी:
आटपाडी प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने आटपाडी येथील ग्रामीण रुग्णालयात अत्यावश्यक ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर मशीन देण्यात आले.
सांगली जिल्हा परिषदेचे सदस्य अरुण बालटे,दत्तात्रय पाटील पंच,विजय देवकर, तरुण भारतचे पत्रकार सूरज मुल्ला, ग्रामीण रुग्णालय आटपाडी येथील कोव्हिड योद्धे डॉ.उमाकांत कदम,डॉ.तांबोळी , प्राथमिक शिक्षक संघाचे पोपटराव सूर्यवंशी,आसिफ मुजावर,सुरेश मोटे,संजय काळेल,विजय राजमाने उपस्थित होते.
प्राथमिक शिक्षक संघ यापुढेही मदतीचा हात देणार असल्याचे अध्यक्ष आसिफ मुजावर यांनी सांगितले.
याप्रसंगी आटपाडीतील पेट्रोलपंप चालक,उद्योजक व व्यापारी यांनीही ऑक्सिजन मशीन उपलब्ध करून दिल्या.ग्रामीण रुग्णालयाच्या वतीने प्राथमिक शिक्षक संघ व सर्व दात्यांचे आभार मानण्यात आले.आटपाडी तालुक्यात माणुसकीला साद ही लोकचळवळ व्हावी अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.