भैय्यासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त कुडूस येथे अभिवादन

वाडा/प्रतिनिधी:
महामानव,विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे  सुपुत्र, बौद्धचार्याचे जनक व  चैत्यभूमीचे शिल्पकार सुर्यपुत्र यशवंतराव तथा भैय्यासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त कुडूस येथे अभिवादन करण्यात आले. 
 भारतीय बौद्ध महासभेचे द्वितीय राष्ट्रीय अध्यक्ष भैयासाहेब आंबेडकर हे होते.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणानंतर यशवंतरावांनी स्वतःला धम्मकार्यासाठी झोकून दिले आणि बाबासाहेबांच्या सामाजिक समतेचे काम वेगाने सुरू ठेवले. आज गुरुवार दि.१७ सप्टेंबर रोजी  स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या प्रतिमेला कुडूस येथील रमाबाई नगरातील बुद्धविहारात अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी समाज बांधव व भगिनी उपस्थित होते. सोशल डिस्टनसिंगच्या नियमांचे पालन करत आदरपूर्वक अभिवादन करण्यात आले.