माडगुळेत विहिरीत पडून महिलेचा मृत्यू

नंदकुमार विभुते
माडगुळे/ प्रतिनिधी:

माडगुळे येथे आज मंगळवार दि. १५.९.२०२० रोजी दुपारी १२च्या सुमारास कपडे धुण्यासाठी गेलेल्या सौ. स्नेहल ज्ञानेश्वर राक्षे (वय वर्ष २२) या महिलेचा विहिरीत पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली.
सौ.स्नेहल ज्ञानेश्वर राक्षे ही महिला दुपारी बाराच्या दरम्यान घरापासून जवळच असलेल्या स्वतःच्या विहिरीवर कपडे धुण्यासाठी गेली होती. पाणी काढत असताना तिचा पाय घसरल्यामुळे पाण्यात ती पडली. पोहता येत नसल्यामुळे तिचा बुडून मृत्यू झाला. या महिलेस २ वर्षाची व एक चार महिन्याची अशा दोन लहान मुली आहेत. विहिरीस पाणी भरपूर असल्यामुळे मृतदेह काढण्यास बराच वेळ लागला.तो पाण्यातून काढून शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला.