
कविता घाडगे,देवराष्ट्रे/प्रतिनिधी:
यशवंतराव चव्हाण सागरेश्वर वन्यजीव अभयारण्य देवराष्ट्रे येथील विविध विकास कामांतील भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांवर त्वरित फौजदारी स्वरूपाची कारवाई करणेच्या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीच्यावतीने अभयारण्य गेटसमोर बुधवारपासून आमरण उपोषण करणार असलेचे निवेदन वंचितचे युवक जिल्हाध्यक्ष राजेश गायगवाळे यांनी जिल्हाधिकारी यांना दिले आहे.
निवेदनात म्हटले आहे कि, सागरेश्वर अभयारण्यात समितीच्या माध्यमातून साहित्य खरेदीमध्ये प्रचंड घोटाळा झाला आहे. बाजारभावापेक्षा दुप्पट ते चौप्पट किंमतीत वस्तू खरेदी केली आहे. बोगस मजुरांची नावे नोंदवत आर्थिक गैरव्यवहार झालेला आहे.तसेच 3 वर्षांतील नमुना 32 रजिस्टर व धनादेश पुस्तकेच गायब केलेली आहेत.अनेक कामे निकृष्ट दर्जाची आहेत. निकृष्ट कंपाउंडमुळे मोकाट कुत्र्यांचे हल्ले होऊन वारंवार हरिणांचे मृत्यू होत आहेत. त्याचप्रमाणे कॅशबुकमध्ये विविध केली नसलेली कामे दाखवत शासकीय निधीची लूटच केलेली आहे.
याबाबत गेले वर्षभर माहिती अधिकार,निवेदन, आंदोलन याद्वारे कारवाईसाठी मागणी करत असताना अद्याप कारवाई झालेली नाही.आंदोलनादरम्यान वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून लेखी आश्वासन देऊनदेखील कारवाई होत नसलेने आम्ही उपोषण करत आहोत.तसेच बुधवारी होणाऱ्या आंदोलनात वंचित बहुजन आघाडीसह 15 विविध पक्ष व संघटना तसेच देवराष्ट्रे गावातील ग्रामस्थ व सामाजिक कार्यकर्ते सहभागी होणार आहेत.

संबंधित बातम्या
प्रवीण बागड़े यांना माफसूचा उत्कृष्ट अधिकारी पुरस्कार प्रदान
कुसमोड येथील कैलास घोंगडे या शेतकऱ्याच्या गाईवर तरसाच्या हल्लयात गाईचा मृत्यू
येळावीत रक्तदान शिबिरास युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद