
संजय हुलगे
माळशिरस प्रतिनिधी :
मुस्लिम आरक्षण संघर्ष समन्वय समिती महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष रशिद शेख यांनी कोळेगांव ता. माळशिरस येथील पत्रकार शाहरुख पिरसाहेब मुलाणी यांची माळशिरस तालुका सोशल मीडिया प्रमुखपदी नियुक्ती केली आहे.
त्याचबरोबर पिलीव येथील सोहेल बागवान यांची तालुका कार्याध्यक्षपदी,काजम अली तांबोळी यांची तालुका संघटक तर सद्दाम काझी यांची पिलीव शहर अध्यक्षपदी नियुक्ती केल्याचे पत्र देण्यात आले.
मुस्लिम आरक्षण संघर्ष समन्वय समितीच्या माध्यमातून समजातील युवाशक्तीचे संघटन करून त्यांचे प्रश्न सोडवण्याचे प्रयत्न करावेत,असे प्रदेशाध्यक्ष रशिद शेख यांनी सांगितले. यावेळी संस्थापक अध्यक्ष अमीर शेख, प्रदेशाध्यक्ष रशिद शेख, महाराष्ट्र राज्य मीडिया प्रमुख सलमान शेख उपस्थित होते.या निवडीबद्दल सर्वत्र अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या जात आहेत.

संबंधित बातम्या
प्रवीण बागड़े यांना माफसूचा उत्कृष्ट अधिकारी पुरस्कार प्रदान
कुसमोड येथील कैलास घोंगडे या शेतकऱ्याच्या गाईवर तरसाच्या हल्लयात गाईचा मृत्यू
येळावीत रक्तदान शिबिरास युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद