महाराष्ट्र नवनिर्माण सेना औसा तालुक्याच्या वतीने तहसिलदार यांना निवेदन


मुख्तार मणियार
औसा/प्रतिनिधी:

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून शेतकऱ्यांना जनावरासाठी गोठा बांधकाम करण्यासाठीचे प्रस्ताव ग्रामपंचायतीमार्फत त्वरित मागवून घ्यावेत व गरजू शेतकरी तथा पशुपालकांना सदरील योजनेतून गोठा बांधकामास निधी प्राप्त करून द्यावा, या मागणीचे निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण सेना तालुका औसाच्या वतीने उपविभागीय अधिकारी औसा व तहसीलदार औसा यांना मनसेच्या प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या वतीने निवेदन देण्यात आले.
यावेळी निवेदनावर मनसेचे तालुका अध्यक्ष शिवकुमार नागराळे, शहराध्यक्ष मुकेश देशमाने ,महेश बनसोडे, जीवन जंगाले ,अमोल परिहार, विवेक महावरकर, गोपाळ शेळके, सचिन बिराजदार ,राजेंद्र कांबळे ,धनराज गिरी ,विकास लांडगे, अमोल बिराजदार, गुणवंत लोहार, ईश्वर परिहार, योगेश पाटील ,गोविंद चव्हाण, तानाजी गरड, गणेश काळे, महादेव गुरू शेटे यांच्या सह्या आहेत.