
नंदकुमार विभुते
माडगुळे /प्रतिनिधी:
राज्यात वृक्षारोपण मोठ्या प्रमाणात व्हावे,यासाठी शासनस्तरावर अनेक प्रयत्न होत आहेत. परंतु सामाजिक बांधिलकी जपत आखिल भारतीय यलमार समाज प्रतिष्ठानने एक आगळा वेगळा निर्णय घेतला असून त्यामध्ये समाजातील व्यक्तीने आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने 100 झाडे लावून फोटो पाठवा, तरच त्या व्यक्तीला सर्वांच्या शुभेच्छा घ्यायच्या, असा निर्णय घेण्यात आल्याचे अखिल भारतीय यलमार समाज परिषदेचे अध्यक्ष संग्राम पाटील यांनी सांगितले.
यलमार समाज प्रतिष्ठान यांच्या वतीने सातत्याने नवनवीन उपक्रम राबवले जातात. त्यामध्ये वधू-वर सूचक मेळावा ,शालेय विद्यार्थ्यांना पुस्तक वाटप ,नवीन उद्योजकांना मार्गदर्शन ,ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना पुणे-मुंबई येथे निवासाची व्यवस्था, नोकरी मार्गदर्शन असे विविध उपक्रम राबवले जातात. यापुढील काळात प्रत्येक गावात यलमार समाज प्रतिष्ठान’च्या माध्यमातून वृक्षरोपण अभियान हाती घेऊन प्रत्येक गावात एक चांगल्याप्रकारे वनीकरणाची चळवळ राबवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केला पाहिज,े असे मत अजित कंडरे यांनी व्यक्त केले. यावेळी यलमार समाज प्रतिष्ठानच्या या बैठकीला रंगनाथ कंडरे ,पुण्याचे माजी पोलिस उपअधीक्षक गणपतराव माडगूळकर,यलमार समाज प्रतिष्ठानचे सचिव अमोल यलमार , सहसचिव राजेंद्र कंडरे (सर ),भाऊसाहेब कंडरे अॅड.श्रीधर यलमार,मुंबई येथील बांधकाम व्यवसायिक अजित कंडरे,उत्तम यलमार, धुळे येथील रवींद्र जिरेकर, योगेश विभुते,पंढरपूर येथील सुहास गुराडे,अमित इलेक्ट्रिक इंडस्ट्रीजचे चेअरमन बाळासाहेब लोकरे ,उद्धव गुगले,पांडुरंग साखर कारखान्याचे संचालक बाळासाहेब यलमार, चंद्रशेखर कोळवले ,डॉ.श्रीधर यलमार, सांगोला येथील गोविंद विभुते ,चंद्रकांत यलपले आदी मान्यवर उपस्थित होते.

संबंधित बातम्या
प्रवीण बागड़े यांना माफसूचा उत्कृष्ट अधिकारी पुरस्कार प्रदान
कुसमोड येथील कैलास घोंगडे या शेतकऱ्याच्या गाईवर तरसाच्या हल्लयात गाईचा मृत्यू
येळावीत रक्तदान शिबिरास युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद