
अनिल मदने
जत /प्रतिनिधी:
जत तालुक्यातील वयोवृध्द महिलेवर अत्याचार केलेल्या आरोपीला तात्काल अटक करुन कठोर शिक्षा करावी,तसेच पिडीत महिलेला पोलिस संरक्षण द्यावे या मागणीचे निवेदन वंचित बहुजन आघाडी व जत फ्रेंड्स सर्कल तर्फे प्रांताधिकारी व उपविभागीय पोलिस अधिकारी यांना देण्यात आले.
वयोवृद्ध महिलेवर अत्याचार होऊन 15 दिवस होऊन गेले. तरीही आरोपी अजून सापडलेला नाही.त्याच आरोपीच्या भीतीच्या छायेत पीडित महिला व तिचे कुटुंब आहे. पीडित महिलेला तात्काळ पोलीस संरक्षण मिळावे आणि आरोपीला लवकरात लवकर अटक होऊन कठोरात कठोर शिक्षा व्हावी अन्यथा याचे तीव्र पडसाद तालुक्यासहित जिल्हाभर उमटतील. तसेच आक्रमक आंदोलन करू,असे निवेदन वंचित बहुजन आघाडी आणि जत फ्रेंड्स सर्कल तर्फे प्रांताधिकारी, उपविभागीय पोलिस अधिकारी यांना देण्यात आले.वंचितचे तालुका अध्यक्ष अमोल साबले, श्रीकांत सोनवणे उपस्थित होते.

संबंधित बातम्या
मटण खायला घालत नाही म्हणून मुलाने केला बापाचा खून
कॅम्पमध्ये गुन्हेगाराचा खून
पिलीव गावात एकाच रात्री चार घरफोड्या