कामगार सेनेकडून उपविभागीय कृषी अधिकारी यांचा सत्कार

जत तालुक्यात सेंद्रिय शेतीला चालना देणार: दिनकर पतंगे


अनिल मदने
जत/ प्रतिनिधी :

जत येथील कृषी विभागात नवनियुक्त रूजू झालेले उपविभागीय कृषी अधिकारी वेताळ यांचा जत तालुका कामगार सेनेच्या वतीने सत्कार करण्यात आला.महाराष्ट्र कामगार सेनेचे राज्य प्रदेश उपाध्यक्ष दिनकर पतंगे,जत तालुका कामगार सेना प्रमुख राजेन्द्र आरळी, माजी तंत्र अधिकारी डी. जी. वज्रशेट्टी आणि सामाजिक कार्यकर्ते सहदेव उर्फ एम.जगदीश माळी उपस्थित होते.
यावेळी दिनकर पतंगे यांनी उपविभागीय कृषी अधिकारी वेताळ यांच्याशी शेतीविषयक विविध विषयांवर चर्चा केली. जत तालुक्यातील पिंकाची माहिती व तालुक्यातील शेतकर्‍यांनी रासायनिक खतांचा वापर न करता सेंद्रिय खतांचा वापर करावा, यासाठी मार्गदर्शन करणार असल्याचे दिनकर पतंगे यांनी सांगितले. तालुक्यातील डाळिंब, द्राक्ष, भुईमूग, तूर, यांसारख्या अनेक पिकासाठी सेंद्रिय खते वापरावीत, यासाठी शेतकर्‍यांना प्रवृत्त करू असेही ते म्हणाले.तसेच पिकांची लागवड व उगवणक्षमता वाढवण्यासाठी काय करावे? याविषयी चर्चा झाली. शेतीची उपभोक्ता कशी वाढवावी याविषयी लवकरच शेतकर्‍यांना कृषी विभागाचे अधिकारी व पतंगे मार्गदर्शन करणार आहेत. सेंद्रिय शेती करून उत्पादन वाढीसाठी वळावे यासाठी ते प्रयत्न करणार आहेत. यातून सेंद्रिय शेतीला चालना मिळेल असेही दिनकर पतंगे म्हणाले.