जत येथे कवयित्री बहिणाबाई चौधरी यांची जयंती साजरी

अनिल मदने
जत/ प्रतिनिधी :

मराठी साहित्य विश्वातील अस्सल ग्रामीण मराठी भाषेतील कवयित्री बहिणाबाई चौधरी यांची जयंती व अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ भरारी पथक सदस्य कार्यालय,नरेश फाउंडेशन जत आणि शिवक्रांती मराठी वृत्तवाहिनी चॅनल व तसेच परिवर्तन हाॅलचा उद्घाटन समारंभ जतमधील साईनगर येथील परिवर्तन हाॅल येथे अतिशय सुंदररित्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अगदी मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत सोशल डिस्टन्स पाळून संपन्न झाला.त्याचबरोबर  10 वी, 12 वी परीक्षेत विशेष प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
कवयित्री बहिणाबाई चौधरी ट्रस्ट जतच्या वतीने सलग चौथ्या वर्षी 24 आॅगस्ट हा दिवस ‘बहिणा डे’ म्हणून साजरा करण्यात आला. आज या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुणे म्हणून मिरज पंचायत समितीच्या माजी सभापती, सामाजिक कार्यकर्त्या व निवृत्त शिक्षिका श्रीमती माणिकताई माळी, कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हा मध्यवर्ती माजी संचालक मंगसुळी मामा,जतमधील सुप्रसिद्ध डॉ. मनोहर मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. या प्रत्येक मान्यवरांनी आपापले मनोगत व्यक्त केले व  विशेष म्हणजे प्रमुख पाहुणे माणिकताई माळी यांनी बहिणाबाई चौधरी यांच्या संपूर्ण जीवनाविषयी मनोगत व कविता सादर केल्या. नवीन पिढीने आदर्शवंत  जीवन कसे जगावे? याचे उत्तम मार्गदर्शन केले व पुढील वर्षाचा बहिणाबाई चौधरी जन्मशताब्दी सोहळा कळंबी येथे घ्यावा अशी विनंती केली. त्यासाठी सर्वोतोपरी मदत करण्याची त्यांनी ग्वाही दिली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. मनोहर मोदी यांनी आपल्या मनोगतात बहिणाबाई चौधरी ट्रस्टच्या कामाचे व संस्थापकांसह संपूर्ण  टिमचे कौतुक केले.यापुढे ट्रस्टला काहीजरी मदत लागली तर निश्चितच करणार असे त्यांनी स्पष्ट सांगितले.
मंगसुळी अण्णांनी देखील ट्रस्टच्या अतिउत्तम कामाचे तोंड भरून कौतुक केले. या कार्यक्रमात बहिणाबाई चौधरी ट्रस्ट जतचे अध्यक्ष राजू सावंत यांनी प्रास्ताविक केले व बहिणाबाई चौधरी यांच्याबद्दल स्वरचित कविता सादर केल्या. यापुढे प्रत्येक शाळा काॅलेजात कवीकट्टा उपक्रम भरवण्यात येणार असून व योग्य नवकविंना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न या ट्रस्टच्या माध्यमातून करण्यात येणार आहे असे त्यांनी सांगितले.

ट्रस्टचे उपाध्यक्ष व चित्रपट महामंडळ भरारी पथक सदस्य दिनकर पतंगे यांनी आपल्या भाषणात बहिणाबाई चौधरी ट्रस्टच्यावतीने  लवकरच ओव्याच्या स्पर्धा भरवण्यात येणार आहे असे सांगितले. ट्रस्टचे सचिव राजेन्द्र आरळी यांनी मनोगत व्यक्त करीत भक्तीगीत सादर केले.
ट्रस्टच्या कार्याध्यक्ष सुषमा मदने यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.तसेच ट्रस्टचे कोषाध्यक्ष व कवी सहदेव माळी उर्फ एम.जगदीश यांनी सूत्रसंचलन केले. त्यांनी अतिशय सुंदर अशा चालीवर रचना सादर केल्या. कार्यक्रमाला अभिनेता राहुल सोनार, पुजारी व साळे, अनेक पालक, साहित्यप्रेमी उपस्थित होते.