
मुख्तार मणियार,औसा/ प्रतिनिधी:
औसा येथील नगरपरिषदेचे वरीष्ठ लिपिक कै. हणमंत सदाशिवराव कसबे यांच्या १४ व्या स्मृती दिनानिमित्त फेरेन्डस क्लब व रे.ऑफ होप फाऊंडेशन यांच्या विद्यमाने महात्मा फुलेनगर येथील साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे सभागृहात रक्तदान शिबीर घेण्यात आले.या शिबिरात ११४ रक्तदात्यांनी रक्तदान केले.
रक्तदानासाठी लातूर ब्लड बँकेचे डॉ.अमोल, डॉ.नयन पाटील, डॉ.कोमल कोकाटे, डॉ.सरीता माळी यांनी सहकार्य केले.शिबिराच्या यशस्वीतेसाठी फेरन्डस क्लबचे धम्मदिप जाधव, गोपाळ धानुरे, सर्व समाज सेवक बांधवांनी योगदान दिले.
कै.हणमंत सदाशिव कसबे यांच्या स्मृतीस श्रीशैल्य उटगे यांनी आदरांजली वाहिली.गोवींद जाधव, नगरसेवक अंगद कांबळे, सतीश जाधव शाहुराज कांबळे,समाज सेवक जयराज कसबे, नगरसेविका मंजुषा हजारे, हणमंत राचट्टे, श्रीमंत क्षीरसागर, संभाजी शिंदे आदिंनी आदरांजली वाहिली.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात ठेवून सोशल डिस्टंन्स ,मास्क, आरोग्य सेतू अॅपचे नियम पाळून कार्यक्रम घेण्यात आला.कोरोना विषाणूच्या वैश्विक महामारीमुळे राज्यात होत असलेल्या रक्ताचा तुटवडा लक्षात ठेवून ११४ रक्तदात्यांनी दिलेल्या रक्तदानाचे कौतुक होत आहे.

संबंधित बातम्या
प्रवीण बागड़े यांना माफसूचा उत्कृष्ट अधिकारी पुरस्कार प्रदान
कुसमोड येथील कैलास घोंगडे या शेतकऱ्याच्या गाईवर तरसाच्या हल्लयात गाईचा मृत्यू
येळावीत रक्तदान शिबिरास युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद