दिनकर पतंगे यांच्या परिवर्तन हॉलला तुकाराम बाबा महाराज यांची सदिच्छा भेट

अनिल मदने
जत/ प्रतिनिधी :

जत येथील साईनगरमध्ये दिनकर पतंगे यांनी परिवर्तन हाॅल उभे केले असून त्याला चिखलगी भुयारी मटाचे मठाधिपती तुकाराम बाबा महाराज यांनी भेट देऊन पाहणी केली. त्यांचा सत्कार जत मधील बालरोगतज्ज्ञ डॉ. नितीन पतंगे यांनी केला.समाजासाठी झटणारे पतंगे यांचे त्यांनी कौतुक केले.यापुढे समविचारी कामासाठी एकत्रितपणे काम करु, असे तुकाराम बाबा महाराज यांनी स्पष्ट केले. पतंगे यांनी आतापर्यंत लाॅकडाऊनमध्ये समाजातील तळागाळातील लोकांपर्यंत पोहचून बरीच कामे केली आहेत.त्यांचे तालुक्यात सर्वत्र कौतुक होत आहे.यावेळी सामाजिक कार्यकर्ते सहदेव उर्फ एम जगदीश माळी व अन्य मंडळी उपस्थित होते.