अनिल मदने,जत/प्रतिनिधी:
संत रोहिदास सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य व चर्मकार ऐक्य परिषद महाराष्ट्र राज्य संलग्न या सामाजिक संघटनेच्या जत तालुकाध्यक्षपदी परशुराम होनमोरे यांची निवड करण्यात आली आहे.
निवडीबद्दल जत नगरपरिषदेचे माजी बांधकाम सभापती परशुराम मोरे यांच्या हस्ते होनमोरे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी युवक नेते आप्पू माळी,सामाजिक कार्यकर्ते मेहबूब शेख,सिद्धेश्वर जाधव,महेश साळे आदी उपस्थित होते.
यावेळी सत्काराला उत्तर देताना होनमोरे म्हणाले की, संत रोहिदास सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष बाबूरावजी माने व चर्मकार ऐक्य परिषद महाराष्ट्र राज्य संस्थापक विठ्ठल व्हनमारे यांनी ज्या विश्वासाने माझ्यावर जी जबाबदारी दिली आहे. त्यास पात्र राहून यापुढे चर्मकार समाजाच्या तळागाळातील गोरगरीब समाज बांधवाचे प्रश्न सोडविण्याकरीता मी अग्रभागी राहून काम करीन. तसेच संत रोहिदास महाराजांचे विचार बहुजन समाजापर्यंत पोहचविण्याकरीता मी पाठपुरावा करून प्रश्न सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करीन असे ते म्हणाले.


संबंधित बातम्या
प्रवीण बागड़े यांना माफसूचा उत्कृष्ट अधिकारी पुरस्कार प्रदान
कुसमोड येथील कैलास घोंगडे या शेतकऱ्याच्या गाईवर तरसाच्या हल्लयात गाईचा मृत्यू
येळावीत रक्तदान शिबिरास युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद