धर्मपुरी येथे आरोग्य सेविका मनिषा खांडे यांचे हस्ते ध्वजारोहन सपंन्न

आदर्श गाव धर्मपुरीचे सरपंच बाजीराव काटकर यांचा आदर्श उपक्रम

संजय हुलगे /माळशिरस, प्रतिनिधी:

धर्मपुरी ग्रामपंचायतीच्या वतीने खरे कोरोना योद्धा धर्मपुरी आरोग्य उपकेंद्राच्या आरोग्य सेविका  मनिषा खांडे  व त्यांच्या सहकारी अर्धवेळ स्त्री परिचारिका  गौरी रणदिवे यांच्या हस्ते झेंडा वंदन करण्यात आले. यावेळी विद्यमान सरपंच सरपंच बाजीराव काटकर, आबा माने ग्रामसेवक  बी. एस. गोरे सदस्य. गजानन पाटील, सागर झेंडे, सुरेश कर्चे, दादा पाटोळे, संतोष ठेंगील हायस्कुलचे मुख्याध्यापक वाघ सर, त्यांचे सहकारी ग्रामस्थ नंदकुमार राऊत, मोहन राऊत, कोतवाल बाबा झेंडे उपस्थित होते. धर्मपुरी गावचे सरपंच बाजीराव काटकर यांनी मनाचा मोठेपणा दाखवून सध्या कोरोना विषारी विषाणूपासून जनतेची सुटका व्हावी. यासाठी अहोरात्र पणे जनतेची सेवा करीत असलेले आरोग्य विभागातील मनिषा खाडे  व गौरी रणदिवे  यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करून त्यांना 15 ऑगस्ट 2020 चा ध्वजारोहन करण्याचा बहुमान दिलेला असल्याने आदर्श गाव धर्मपुरी चे सरपंच बाजीराव काटकर यांचा आदर्श उपक्रम खऱ्या अर्थाने ग्रामीण भागामध्ये काम करणाऱ्या योद्ध्यांमध्ये आरोग्य विभागाची भूमिका महत्त्वाची असते. त्यामुळे त्यांनी केलेल्या कार्याचा एक प्रकारे ग्रामपंचायत ने गुणगौरव केलेला आहे. धर्मपुरी ग्रामपंचायतचा आदर्श इतर ग्रामपंचायती यांनीही घेण्यासारखा आहे.