कंटेनरखाली चिरडून ५ महिला ठार,२ जखमी

कटफळनजीक बंडगरवाडी येथील घटना
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/महूद:
कराड-पंढरपूर महामार्गावर सांगोला तालुक्यातील कटफळनजीक असलेल्या बंडगरवाडी येथे कंटेनर खाली चिरडून पाच महिला जागीच ठार झाल्या तर दोन जखमी झाल्या आहेत. जखमींना पंढरपूर येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.आज दुपारी ही घटना घडली.


घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, सांगोला तालुक्यातील कटफळ येथील काही महिला कामगार बंडगरवाडी येथे मजुरीसाठी गेलेल्या होत्या. आपले काम उरकून घरी परत येण्यासाठी बंडगरवाडी येथील कराड-पंढरपूर महामार्गावरील थांब्यावर थांबलेले होत्या.

यावेळी एम एच ५० एन ४७५७ हा कंटेनर पंढरपूरहुन भरधाव वेगाने येत असताना चालकाचा ताबा सुटल्यामुळे सदरचा कंटेनर महिलांच्या अंगावर जाऊन त्या चिरडल्या गेल्या. यामध्ये पाच महिला ठार झाले असून दोघीजणी जखमी झाल्या आहेत. जखमींना तातडीने पंढरपूर रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले आहे.
घटनेची माहिती मिळताच कटफळ परिसरात शोककळा पसरली आहे.