प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
म्हसवड
माण तालुक्यातील गोंदवले खुर्द गावच्या हद्दीतील शीलवंत वस्तीच्या सुरज सुनील शीलवंत (वय-२८ वर्षे) या तरुणाने राहत्या घरात लोखंडी अँगलला साडीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी मयत सुरजचे वडील सुनील जनार्दन शीलवंत (वय -५२ वर्षे) यांनी दहिवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार दहिवडी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार विठ्ठल विरकर करीत आहेत.

संबंधित बातम्या
मटण खायला घालत नाही म्हणून मुलाने केला बापाचा खून
कॅम्पमध्ये गुन्हेगाराचा खून
पिलीव गावात एकाच रात्री चार घरफोड्या