अन्न व भेसळ प्रशासनाचे अर्थपूर्ण दुर्लक्ष
स्थानिक पोलिसांचे गुटखा विक्रेत्यांना पाठबळ असल्याचा आरोप
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
सेनगाव
महाराष्ट्र राज्यात 20 जुलै 2012 रोजी गुटखाबंदीचा निर्णय झाला असून या निर्णयाला तब्बल 12 वर्षे पूर्ण होत आहेत मात्र या कायद्याची संबंधित विभागाकडून कडक अंमलबजावणी होत नसल्यामुळे सेनगाव शहरासह तालुक्यातील बहुतांश गावातील पानपट्टी किराणा दुकान हॉटेल मध्ये सरासपणे चोरट्या मार्गाने गुटका माफियाकडून एजंटमार्फत खुलेआम गुटखा घरपोच विक्री होताना दिसते परंतु प्रतिबंधित गुटखा विक्रीकडे अन्न व भेसळ प्रशासनाचे अर्थपूर्ण दुर्लक्ष होत असल्याचा आरोप सामान्य जनतेतून केला जात असून स्थानिक पोलिसांचे गुटखा विक्रेत्यांना पाठबळ मिळत असल्यामुळे तालुक्यातील खेड्यापाड्यापर्यंत गुटखा विक्रेत्यांचे जाळे पसरले असल्यामुळे सेनगाव शहरासह तालुक्यात सर्ससपणे गुटक्याची विक्री होत असल्याचा आरोप सामान्य जनतेतून केला जात आहे. तालुक्यात गुटक्यांची विक्री वाढल्यामुळे तरुण युवक या गुटख्याच्या आहारी जात असल्याचे चित्र तालुक्यात दिसून येत आहे.
दि.5 ऑगस्ट 2011 पासून अन्नसुरक्षा व मानके कायद्या 3, 2006 नुसार संपूर्ण देशांमध्ये गुटखाबंदी कायदा लागू करण्यात आला तसेच या कायद्यान्वये महाराष्ट्रात देखील तंबाखूजन्य पदार्थावर सुद्धा बंदी घालण्यात आली मात्र सेनगाव शहारासह तालुक्यात कायद्यांची पायमल्ली करून गुटखा माफीया हे परराज्यातून सर्ससपणे खुलेआम गुटखा विक्री सेनगाव शहारासह तालुक्यातील पुसेगाव, गोरेगाव, आजेगांव, साखरा, हात्ता, पानकनेरगाव, कोळसा, सवना, खिल्लार, अडोळ, खुडज, गोंडाळा,तळणी, वरुड चक्रपान, पळशी, जवळा, ब्रम्हवाडी, पार्डी पोहकर, भानखेडा, यासह आदी गावात गुटखा माफीया यांचे एजंट दुचाकी वर व पिकप वर खुलेआम सर्ससपणे प्रतिबंधित असलेल्या गुटक्यांची विक्री करीत असल्याचे दिसून येत आहे.
चोरट्या मार्गाने अवैध गुटखा विक्री करणाऱ्यावर कारवाई करण्यासाठी अन्नप्रशासन विभागाचे कार्यालय परभणी येथे असल्यामुळे हिंगोली जिल्ह्यातील कारवाईकडे पूर्णपणे डोळे झाकवत असल्याचे चित्र समोर येत आहे प्रतिबंधित गुटखा विक्री करणाऱ्यावर कारवाई केल्यातरही परभणी अन्नप्रशासन विभागाच्या वतीने थातूरमातूर कारवाई करून प्रतिबंधित गुटखा विक्रेत्यांचे पाठरखान होत असल्याचे सर्वसामान्य जनतेतून बोलले जात आहे.
हिंगोली जिल्ह्याची निर्मिती 1 मे 1999 ला झाली आहे.या जिल्ह्याची निर्मिती होऊन तब्बल 25 वर्षे लोटले जात आहेत. तरीही अन्नप्रशासन विभागाचा कारभार हा परभणी जिल्ह्यातूनच बघितला जातो. त्यामुळे गुटखा विक्रेत्यावर ठोस कारवाई करण्यासाठी अधिकाऱ्यांची वाट बघावी लागत असल्याचे सामान्य जनतेतून बोलले जात आहे.
तालुक्यात सर्व सामान्य गुटखा विक्रेत्यावर कारवाई होती. परंतु मुख्य गुटखा माफियावर आजपर्यंत मोठे कारवाई केल्याचे दिसून आले नाही. त्यामुळे कारवाई करूनही तालुक्यात अवैध गुटखा सर्ससपणे खुलेआम विक्रीचा उच्छत दिसून येत आहे. हिंगोली जिल्हा पोलीस अधीक्षकाचा पदभार जी श्रीधर यांनी घेतला
तेव्हापासून जिल्ह्यातील चोरट्या मार्गाने चालत असलेले अवैध धंदेवाल्याला चपरक बसली असून अवैध धंदे व गुन्हेगारीला आळा बसला आहे पण स्थानिक पोलिसाकडून अवैध धंदे व चोरट्या मार्गाने खुलेआम गुटखा विक्रीला पाठबळ मिळत असल्यामुळे सेनगाव तालुक्यात चोरी चुपके अवैध धंदे व सर्ससपणे गुटका विक्री चालू आहे या स्थानिक पोलिसांवर पोलीस अधीक्षक जी श्रीधर लक्ष देऊन तालुक्यातील खुलेआम गुटखा विक्री बंद होईल का? असा प्रश्न सर्वसामान्य जनतेपुढे पडला आहे. तसेच अन्नप्रशासन विभाग या बाबीकडे लक्ष देईल का? सेनगाव तालुक्यातील चोरट्या मार्गाने खुलेआम गुटखा विक्री बंद होईल का? याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.

संबंधित बातम्या
मटण खायला घालत नाही म्हणून मुलाने केला बापाचा खून
कॅम्पमध्ये गुन्हेगाराचा खून
पिलीव गावात एकाच रात्री चार घरफोड्या