शेटफळे येथे विवाहितेवर बलात्कार


प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/आटपाडी

आटपाडी तालुक्यातील शेटफळे येथे विवाहितेवर बलात्कार केल्याची घटना घडली. याप्रकरणी संशयित आरोपी सतीश रामहरी गायकवाड याच्यावर आटपाडी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दखल करण्यात आला आहे.

आटपाडी पोलिसांकडून याबाबत मिळालेली माहिती अशी की, आटपाडी तालुक्यातील एका गावातील ही पीडित महिला ही तिच्या घरी चालत येत असताना सतीश रामहरी गायकवाड रा.आटपाडी जि.सांगली याने ‘मी तुम्हाला घरी सोडतो’ असे म्हणून ती नको म्हणत असतानाही तिला गाडीवर बसायला भाग पाडून दि.16/02/2024 रोजी रात्री 09.00 वा चे सुमारास रस्त्यावर गाडीवरून खाली येऊन तिच्या अंगावर हात टाकला. ती आरोपीला ‘असलं काही आमच्यात चालत नाही, माझ्या माहेरात पण घडलं नाही आणि सासरमध्ये पण घडत नाही, तुला कोणी आई बहिण आहे का नाही, मी काय रस्त्यावर पडल्या का?’ असे म्हणून ती ओरडल्यावर आरोपीने तिच्या तोंडावर हात ठेवून तोंड दाबून धरून बलात्कार केला.

अशा स्वरूपाची फिर्याद पिडीतेने आटपाडी पोलीस ठाण्यामध्ये दिली आहे.गुन्हा घडल्यानंतर तिचे पतीला याबाबत तिने सांगितले होते. परंतु तिचे पती व्यवसायासाठी परराज्यात होते. ते आलेनंतर पिडीतेस घेऊन पोलीस स्टेशनला तक्रार देण्यात आले.पोलीस उपनिरीक्षक देशपांडे यांनी घटनास्थळी भेट दिली.