
जांभुळणी येथील तरुणावर मुलीचा विनयभंग,अत्याचार केल्याप्रकरणी ॲट्रॉसिटीसह गुन्हा दाखल!
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/ म्हसवड
अनुसुचित जातीतील मुलीचा विनयभंग करुन अत्याचार केल्याप्रकरणी जांभूळणी ता.माण येथील विक्रम मारुती काळेल याचेविरुद्ध म्हसवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
‘तू आवडतेस, तू माझ्याशी बोल,माझं तुझ्यावर खरं प्रेम आहे, मी तुझ्यासोबत लग्न करेन’ अशी बतावणी करुन वारंवार विनयभंग व याबरोबरच अत्याचार करुन नंतर कोणास सांगितले तर ‘तुझी मी बदनामी करेन’ अशी धमकी देऊन अनुसुचित जातीतील मुलीस जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी विक्रम मारुती काळेल रा.जांभुळणी (ता.माण ) याचे विरुद्ध म्हसवड पोलिस ठाण्यात अनुसूचित जाती आणि जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत म्हसवड पोलीस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी की, नोव्हेंबर 2023 (नक्की तारीख माहीत नाही) रात्री आठ वाजण्याच्या सुमारास, त्यानंतर दिनांक 31 मार्च 2024 रोजी रात्री अकरा वाजताच्या दरम्यान जांभुळणी (ता.माण ) गावचे हद्दीत संशयित आरोपी विक्रम काळेल याने त्याच्या दुकानात याबरोबरच, गावाबाहेर माळरानात पीडित मुलीला मोटार सायकलवरून पाठलाग करून मोबाईलवर त्याचे मोबाईलवरून वारंवार फोन करून ‘तू आवडतेस,तू माझ्याशी बोल, माझं तुझ्यावर खरं प्रेम आहे, मी तुझ्यासोबत लग्न करेन’ असे म्हणून त्याचे दुकानावर बोलावून घेऊन जबरदस्तीने दुकानातच अत्याचार केला.कोणास सांगितले तर वारंवार बदनामी करुन तसेच जिवंत ठेवणार नाही अशी धमकी देऊन त्याने त्याचेकडील असलेल्या पिकअप या चारचाकी वाहनामध्ये बसवून गावातून बाहेर माळरानात आड बाजूस नेहून वारंवार तिचेवर जबरदस्तीने इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध ठेवले.त्यामुळे तिला दिवस गेले.
त्यानंतर तिला गोळ्या आणून खाण्यासाठी दिल्या. तिच्या पोटात दुखून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला. तसेच सदरचा प्रकार कोणाला सांगितलेस ठार मारण्याची धमकीही दिल्यामुळे अत्याचार पीडित मुलीने म्हसवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
यानंतर संबंधित संशयित आरोपीवर गुन्हा दाखल करणेत आला असुन सदर गुन्ह्याचा तपास दहिवडी कार्यालयाचे उपविभागीय पोलीस अधिकारी करीत आहेत.

संबंधित बातम्या
मटण खायला घालत नाही म्हणून मुलाने केला बापाचा खून
कॅम्पमध्ये गुन्हेगाराचा खून
पिलीव गावात एकाच रात्री चार घरफोड्या