एसटी बसमधून तीन लाखांचे दागिने लंपास

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
टेंभुर्णी

किल्ले धारूर ते पुणे या बसमध्ये जात असताना गर्दीचा फायदा घेऊन एका महिलेने सौ.वर्षा रविंद्र गायकवाड यांच्या पर्समधून सहा तोळे सोने, तीन लाखांचा सोन्याचा ऐवज लंपास केला .

याबाबत सविस्तर माहिती अशी की, दिनांक 1/4/ 2024 रोजी संध्याकाळी साडेचार ते पाच वाजण्याच्या दरम्यान टेंभुर्णी येथील एसटी स्टँडमध्ये सौ.वर्षा रवींद्र गायकवाड, (वय 50 वर्ष, धंदा नोकरी सेनापती बापट चौकजवळ, मासणे, दापोडी पुणे 12 ता.हवेली जि. पुणे) या टेंभुर्णी बस स्टॅन्ड येथे किल्ले धारूर ते पुणे जाणारी बसमध्ये चढत असताना सौ.वर्षा गायकवाड यांच्या पर्समधून 1) 25 ग्रॅम वजनाचे दोन पदर असलेले सोन्याचे मंगळसूत्र 2) 35 ग्रॅम वजनाचे सोन्याचे गंठण. 3) 2 ग्रॅम वजनाचे कानातील टॉप्स असे एकूण तीन लाख रुपये किंमतीचे सोने, एसबीआय खात्याचे एटीएम कार्डची चोरी केली.

संशयित महिला एका गुलाबी रंगाचा कुडता व पांढरी रंगाची सलवार व तोंडास पांढऱ्या रंगाची ओढणी बांधलेली व तिच्या खांद्याला विटकरी पर्स असलेल्या महिलेने लबाडी हेतूने चोरी केले असल्याचा संशय अशी कायदेशीर फिर्याद टेंभुर्णी पोलीस ठाणे गुन्हा र .नं .169 भा. द .वि .कलम 379 प्रमाणे या महिलेविरुद्ध टेंभुर्णी पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. या घटनेचा तपास पोलीस निरीक्षक दीपक पाटील करीत आहेत.