विठलापूर येथील विवाहितेची गळफासाने आत्महत्या

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/आटपाडी
विठलापूर येथील भवानीमळा भागातील ३२ वर्षीय विवाहीत महिलेने घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. आटपाडी पोलीस ठाण्यात घटनेची नोंद झाली आहे.

याबाबत आटपाडी पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की,१७ जानेवारी रोजी दुपारी २.१० वाजण्याच्या पूर्वी भवानीमळा, विठलापूर ता. आटपाडी येथील राहत्या घरात पुष्पा बापू बाड, वय 32 वर्षे या महिलेने घरी लोखंडी अँगलला दोरीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.

या घटनेबाबतची माहिती विठलापुरचे सरपंच विठ्ठल दादासो बाड यांनी फोनद्वारे आटपाडी पोलिसांना कळवली. त्यावरून घटनेची नोंद पोलीस ठाण्यात करण्यात आली असून प्राथमिक तपास करणेकामी पोलीस हेड कॉन्स्टेबल गारळे व सरगर यांना तातडीने रवाना करण्यात आले.