
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/आटपाडी
भारतीय जनता पार्टीच्या आटपाडी तालुका अध्यक्षपदी जयवंतराव सरगर यांची निवड करण्यात आली आहे.
भारतीय जनता पार्टीच्या जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या विविध निवडी पार पडल्या. आटपाडी येथील अनिलशेठ पाटील यांची युवा मोर्चाच्या सांगली जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली.
विलासराव काळेबाग,बाळासाहेब सरगर, शाहीर रणदिवे, रावसाहेब खटके, हनुमंत मगर,रघुराज मेटकरी यांची जिल्हा कार्यकारणी सदस्यपदी निवड करण्यात आली आहे.
आमदार गोपीचंद पडळकर यांचे सुरुवातीपासूनच्या काळातील खंदे समर्थक म्हणून जयवंतराव सरगर परिचित आहेत.संघर्षाचा अनेक काळ हा त्यांनी आमदार गोपीचंद पडळकर यांच्या समावेत घालविला आहे. भारतीय जनता पार्टीचे सत्ता आल्यानंतर आटपाडी पंचायत समितीच्या सभापती पदाचा पदभार त्यांच्या सौभाग्यवती सौ.पुष्पाताई सरगर यांनी यशस्वीपणे सांभाळलेला होता. तळागाळापर्यंत पोहोचण्याच्या त्यांच्या अनुभवाचा भारतीय जनता पार्टीच्या पक्ष वाढीसाठी मोठा फायदा होणार आहे. पक्षाने त्यांची आटपाडी तालुकाध्यक्षपदी निवड केली आहे. त्याबद्दल त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
भारतीय जनता पार्टीने दिलेल्या जबाबदारी सार्थ ठरवित पक्षाच्या वाढीसाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.
या निवडीबद्दल झरे गेस्ट हाऊस येथे आमदार गोपीचंद पडळकर व माजी सभापती ब्रम्हानंद पडळकर यांच्या हस्ते युवानायक अनिलशेठ पाटील,जयवंतभाऊ सरगर, प्रमोद भारते, विलास काळेबाग,बाळासाहेब सरगर, शाहिर रणदिवे, रावसाहेब खटके,हणमंत मगर,रघुराज मेटकरी यांचा सत्कार करण्यात आला.

संबंधित बातम्या
घाणंद ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी प्रविण कदम बिनविरोध
अजनाळे ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीची एकहाती सत्ता
आटपाडी येथे भाजपाच्या वतीने महाविकास आघाडीचा पुतळा दहन करून आंदोलन