मलवडी यात्रेत अल्पवयीन मुलीचा विनयभंग

तिघांवर गुन्हा दाखल
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क /म्हसवड
मलवडी ता.माण गावातील यात्रेत पाळण्याकडे जाणा-या बोळीत एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी योगेश युवराज जाधव, अक्षय उर्फ लाला जाधव, रामा सुखदेव जाधव रा.नवलेवाडी (रामोशीवस्ती ) ता.माण जि. सातारा यांच्याविरुद्ध दहिवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत दहिवडी पोलीस ठाण्यातून मिळालेली माहीती अशी,दि.23/12/2023 रोजी सांयकाळी 6.15 वा. चे सुमारास मौजे मलवडी ता. माण गावातील यात्रेतील पाळण्याकडे जाणा-या बोळीतुन जात असताना एका अलपवयीन मुलीस पाठीमागुन येऊन योगेश युवराज जाधव,अक्षय उर्फ लाला जाधव रामा सुखदेव जाधव यांनी केसाला,हाताला, कंबरेजवळ ड्रेसला धरुन वाईट हेतूने अंधारात ओढुन ‘नदीकडे चल’ असे म्हणाले, म्हणुन पिडीत मुलीने त्या तिघांविरुद्ध दहिवडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.अधिक तपास सपोनि अक्षय सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.उपनिरीक्षक दोलताडे करत आहेत.