चोरीसाठी वृद्ध महिलांचा खून करणारे दोघे खूनी ७२ तासांत जेरबंद

एलसीबी व म्हसवड पोलिसांची कारवाई
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क /म्हसवड
२० डिसेंबर २०२३ रोजी रात्रौ ८.०० ते २१ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी ०७.०० वा. चे दरम्यान मौजे पर्यंती ता. माण जि.सातारा गावचे हद्दीत राहत असलेल्या श्रीमती नंदाबाई भिकु आटपाडकर (वय ५८ वर्षे) व श्रीमती संपताबाई लक्ष्मण नरळे (वय ७५ वर्षे) यांचा अज्ञात इसमांनी त्यांचे अंगावरील सोन्या-चांदीचे दागिने, मोबाईल व रोख रक्कम जबरीने चोरुन नेहण्याकरीता दोघींचा गळा आवळून खून केल्याची घटना घडली. याबाबतची फिर्याद म्हसवड पोलीस स्टेशन गु.र.नं. ३९०/२०२३ भादविस कलम ३०२,३९७,३४ प्रमाणे दाखल करण्यात आली.

ही घटना अतिशय गंभीर असल्याने श्री. समीर शेख, पोलीस अधीक्षक, सातारा व श्रीमती आँचल दलाल, अप्पर पोलीस अधीक्षक सातारा श्रीमती अश्विनी शेंडगे, उपविभागीय पोलीस अधिकारी दहिवडी विभाग दहिवडी, पोलीस निरीक्षक, अरुण देवकर, स्थानिक गुन्हे शाखा सातारा, सपोनि शिवाजीराव विभुते म्हसवड पोलीस स्टेशन यांनी गुन्ह्याचे घटनास्थळी भेट दिली. श्री समीर शेख, पोलीस अधीक्षक सातारा तसेच श्रीमती आँचल दलाल, अपर पोलीस अधीक्षक सातारा यांनी पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना गुन्ह्यातील अज्ञात आरोपींचा शोध घेवुन सदरचा गुन्हा उघडकीस आणणेच्या सुचना दिल्या. त्याप्रमाणे त्यांनी सपोनि रविंद्र भोरे स्थागुशा, पोउनि विश्वास शिंगाडे स्थागुशा, पोउनि पतंग पाटील स्थागुशा सातारा व सपोनि शिवाजीराव विभुते, म्हसवड पोलीस स्टेशन यांचे अधिपत्याखाली तपास पथके तयार करुन तपास पथकास गुन्हा उघडकीस आणणेच्या सुचना दिल्या.

तपास पथकाने गुन्हा घडलेपासुन घटनास्थळावर हजर राहुन सर्वप्रथम आजुबाजुचे साक्षीदार यांचेकडे विचारपुस करुन माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला. परंतु घडले प्रकाराबाबत काही एक माहिती मिळून येत नव्हती. सदरचा गुन्हा उघडकीस आणण्याच्या दृष्टीने तपास पथक सर्वतोपरी प्रयत्न करीत होते. दि. २४/१२/२०२३ रोजी पोलीस निरीक्षक अरुण देवकर स्थानिक गुन्हे शाखा सातारा यांना त्यांचे विश्वसनीय गोपनीय बातमीदारामार्फत बातमी प्राप्त झाली की, परराज्यातील असणारा रहिवासी व सध्या पर्यंती ता. माण जि.सातारा गावात राहणारा जे.सी.बी.चालक व त्याचा साथीदार

१)अजित कुमार रामकिशोर पटेल वय -29 रा.परसिधी करोल खुर्द सिधी सिहवालं मध्य प्रदेश २)संदीप शेषमणी पटेल वय वर्ष 30 वर्ष राहणार परसिधी करोल खुर्द सिधी सिहवालं मध्य प्रदेश असे दोघांनी मिळून सोन्याचे दागिने व पैशासाठी नमुद दोन महिलांचा खुन केला आहे. सदरची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांनी तपास पथकांना नमुद इसमांचा शोध घेवुन त्यांना ताब्यात घेण्याच्या सुचना दिल्या.

नमुद तपास पथकांनी पर्यंती ता. माण गावचे परिसरात व आजुबाजुचे परिसरात प्राप्त माहितीतील इसमांचा शोध घेवुन त्यांना ताब्यात घेतले. त्यांचेकडे नमुद गुन्ह्याचे अनुषंगाने सखोल व कौशल्यपूर्ण विचारपुस केली असता त्यांनी सदरचा गुन्हा सोन्याचे दागिने व पैसे मिळवण्याकरीता केला असल्याचे सांगितल्याने सदरचा दुहेरी खूनाचा गुन्हा ७२ तासाच्या आत उघडकीस आणण्यास यश प्राप्त झाले आहे.

श्री. समीर शेख पोलीस अधीक्षक, सातारा, श्रीमती आँचल दलाल, अपर पोलीस अधीक्षक सातारा, श्रीमती अश्विनी शेंडगे, उपविभागीय पोलीस अधिकारी दहिवडी विभाग, श्री. राजेंद्र शेळके, उपविभागीय पोलीस अधिकारी, कोरेगाव, पोलीस निरीक्षक, अरुण देवकर, स्थानिक गुन्हे शाखा सातारा, शिवाजीराव विभुते, सपोनि म्हसवड पोस्टे, सपोनि सुधीर पाटील, रविंद्र भोरे, पोउनि पतंग पाटील, विश्वास शिंगाडे, अमित पाटील, अनिल वाघमोडे, फॉरेन्सिक विभागाच्या सपोनि रुपाली मोरे, स्थानिक गुन्हे शाखेकडील पोलीस अंमलदार सुधीर बनकर, संतोष सपकाळ, अतिश घाडगे, संजय शिर्के, बिजय कांबळे, शरद बेबले, प्रविण फडतरे, लक्ष्मण जगधने, लैलेश फडतरे, अमोल माने, प्रमोद सावंत, अमित सपकाळ, गणेश कापरे, अमित माने, अविनाश चव्हाण, मोहन पवार, ओंमकार यादव, विशाल पवार, रोहित निकम, सचिन ससाणे, वैभव सांवत, पृथ्वीराज जाधव, मयुर देशमुख, स्वप्नील कुंभार, विक्रम पिसाळ, धिरज महाडीक चालक शिवाजी गुरव सायबर विभागाचे अजय जाधव, अमित झेंडे, फॉरेन्सीक विभागाचे राजीव कुंभार, मोहन नाचण तसेच म्हसवड पोलीस स्टेशनचे रवि डोईफोडे, अमर नारनवर, शामराव वाघमारे, शिवाजी जाधव, अभिजोत बहाद्दुले, नवनाथ शिरकुळे, यागेश सुर्यवंशी, धिरज कवडे, जगन्नाथ लुबाळ, भागवत बनसोडे, रुपाली फडतरे, मैना होंगे, यांनी सदरची कारवाई केली आहे.