येळकोट येळकोट जय मल्हारच्या उद्गोषात माडगूळे येथील खंडोबाची यात्रा संपन्न

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
माडगुळे

माडगुळे हे एक तीर्थक्षेत्र, त्या ठिकाणी चंपाषष्ठीचे औचित्य साधून आज लाखो भाविक भक्ताच्या “सदानंदाचा येळकोट येळकोट” “येळकोट येळकोट जय मल्हार” या गजरात भंडार खोबऱ्याच्या उधळणीत भाविकांनी रंग लावून मल्हारी मार्तंड खंडोबाचे दर्शन घेतले, भंडार खोबऱ्याच्या मुक्तहस्ते करण्यात आलेल्या ऊदळणीमुळे संपूर्ण मंदिर परिसर, प्रमुख रस्ते भंडाऱ्याने माखल्यामुळे सोनेरी भासत होते,

आज सकाळी देवाची महापूजा महा- अभिषेकानंतर देवाला वांगे भरीत व बाजरीच्या भाकरीचा रोडग्याचा नैवेद्य दाखवून उत्सवाचा उपवास सोडण्यात आला ,दरवर्षी मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा ते मार्गशीर्ष शुद्ध षष्ठी या कालावधीत चंपाषष्ठी उत्सव साजरा होतो, प्रतिपदेपासून मार्तंड भैरवाने दानवासी युद्ध सुरू केले हे युद्ध सहा दिवस चालले षष्ठीला देवाने दानवावर विजय मिळवला ऋषीमुनींनी चाफ्याच्या फुलाने देवाची पूजा करून विजय दिवस साजरा केला अशी आख्यायिका असून तेव्हापासून हा उत्सव साजरा होत आहे

त्या सहा दिवसात लाखो भाविक देवदर्शन साठी येत होते , यात्रेत मोठमोठे पाळणे, झोपाळे, खेळण्याची अनेक प्रकारची साधने ,मेवा मिठाई, आईस्क्रीम, खाऊचे गाडे, त्याचप्रमाणे इतर अनेक प्रकारचे स्टॉल लावून यात्रेला रंगत आणण्यात आली होती संध्याकाळी ५:०० वाजता देवाच्या पालखीने मंदिर प्रदक्षिणा घालून नंगर तोडण्यात आला यावेळी नंगर तोडण्याचा मान बजरंग वाघमारे यांना मिळाला होता आणि तो त्यांनी तोडला, यात्रेत येणाऱ्या सर्व भावीक भक्तांना शिंगन्नळी ता, जत येथील हिप्परकर बंधूनी महाप्रसादाचे आयोजन केले होते