

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
विटा
सुप्रसिद्ध साहित्यिक पु. ल. देशपांडे यांच्या नावाने विटा येथे ४२ व्या ग्रामीण मराठी साहित्य संमेलनात पद्मश्री पु.ल. देशपांडे साहित्यरत्न पुरस्कार मुंबईचे साहित्यिक डॉ. देविदास पोटे यांना व पद्मश्री पु.ल. देशपांडे मुक्तांगण आदर्श शिक्षकरत्न पुरस्कार पुणे विद्यापीठाचे प्रा. डॉ.संदीप सांगळे, व. प्रा. डॉ.प्रकाश दुकळे शिराळा व प्रा.डॉ. संभाजी पाटील लातूर यांना पद्मश्री पु.ल देशपांडे मुक्तांगण आदर्श शिक्षकरत्न पुरस्कार,तसेच गोविंद काळे प्रतिष्ठान यांच्यावतीने पिताश्री ज्ञानोबा बापू काळे साहित्य पुरस्कार प्रा. मुकुंद वलेकर,सांगोला यांना व मातोश्री हौसाबाई ज्ञानोबा काळे साहित्य पुरस्कार रघुराज मेटकरी विटा यांना जाहीर झाला आहे.
हे पुरस्कार दिनांक २४/१२/२०२३ रोजी विटा ग्रामीण मराठी साहित्य संमेलनात सुप्रसिद्ध साहित्य प्रा. रंगनाथ पठारे यांच्या हस्ते दिले जाणार आहेत.असे संयोजक डॉ. ऋषिकेश मेटकरी, प्राचार्या वैशाली कोळेकर,हर्षवर्धन मेटकरी यांनी सांगितले.

संबंधित बातम्या
प्रवीण बागड़े यांना माफसूचा उत्कृष्ट अधिकारी पुरस्कार प्रदान
कुसमोड येथील कैलास घोंगडे या शेतकऱ्याच्या गाईवर तरसाच्या हल्लयात गाईचा मृत्यू
येळावीत रक्तदान शिबिरास युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद