
जास्तीत जास्त शासकीय कर्मचाऱ्यांनी मोर्च्यात सहभागी व्हावे – तालुकाध्यक्ष नितीन गळवे
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
आटपाडी
महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेतर्फे हिवाळी अधिवेशनावेळी नागपूरला १२ डिसेंबरला पेन्शन जनक्रांती महामोर्चा काढण्यात येणार आहे. मोर्चाच्या यशस्वितेसाठी मोठ्या प्रमाणात आटपाडी तालुक्यातून शासकीय कर्मचाऱ्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन नितीन गळवे यांनी केले . ते म्हणाले महामोर्चात दहा लाख कर्मचारी सामील होतील असे नियोजन करण्यात येत आहे.राज्यभरातील सर्व शासकीय, निमशासकीय विभागातील कर्मचारी यांचा जुनी पेन्शन जिव्हाळ्याचा प्रश्न असून, सर्व कर्मचाऱ्यांनी जुनी पेन्शन मिळालीच पाहिजे.यासाठी हे आंदोलन अंतिम लढाई आहे..या आर पार च्या लढाईत सर्वांनी सहभागी व्हावे. या सभेत उपस्थित सर्व कर्मचाऱ्यांनी महामोर्च्यात सहभागी होण्याचा निर्धार केला. या बैठकी साठी नितीन गळवे, दीपक कबीर, दत्तात्रय सुतार, विजय चव्हाण, विशाल कवडे, मारुती देशमुख,शरद खांडेकर, अरविंद गवळी, अक्षय थोरात, तुकाराम मुंढे, विजय नरळे, म्हमाने सर, महेश इंगोले, प्रशांत कुटे, त्रिदेव वाघमारे,शिवराज मुरकुटे, अमोल पाटील उपस्थित होते.

संबंधित बातम्या
प्रवीण बागड़े यांना माफसूचा उत्कृष्ट अधिकारी पुरस्कार प्रदान
कुसमोड येथील कैलास घोंगडे या शेतकऱ्याच्या गाईवर तरसाच्या हल्लयात गाईचा मृत्यू
येळावीत रक्तदान शिबिरास युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद