
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
राजेवाडी
आटपाडी तालुक्यातील राजेवाडी येथे संविधान दिनानिमित्त प्रसिद्ध व्याख्याते प्रा नितीन बानगुडे – पाटील यांची जाहीर व्याख्यान संपन्न होणार आहे त्याचबरोबर गुणवंत विद्यार्थी सेवानिवृत्त अधिकारी कर्मचारी यांचा देखील यावेळी सन्मान होणार आहे
73 व्या संविधान दिनानिमित्त राजेवाडी येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये शनिवार दिनांक 25 रोजी सायंकाळी 7 वाजता प्रसिद्ध व्याख्याते नितीन बानगुडे- पाटील यांचे व्याख्यान संपन्न होणार आहे. तर दिनांक 26 रोजी सकाळी आठ ते अकरा या वेळेत संविधान दिंडी सोहळा (जनजागृती रॅली) आयोजित करण्यात आली आहे.
या कार्यक्रमास आटपाडीचे तहसीलदार सागर ढवळे, पोलीस निरीक्षक शरद मेमाणे, गटविकास अधिकारी मुक्तेश्वर माडगूळकर, राजवाडी चे लोकनियुक्त सरपंच प्रशांत शिरकांडे, उपसरपंच सौ. सुनिता बाळू माने, तलाठी सौ .रुपाली देशमुख, ग्रामसेवक संजय कर्ण, पोलीस पाटील सचिन हेगडे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत
तरी सदर कार्यक्रमास राजेवाडी तसेच परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन राजेवाडी ग्रामपंचायत व ग्रामस्थ यांच्या वतीने करण्यात आले असून सदरचा कार्यक्रम हा जिल्हा परिषद शाळेसमोर राजेवाडी येथे संपन्न होणार आहे.

संबंधित बातम्या
प्रवीण बागड़े यांना माफसूचा उत्कृष्ट अधिकारी पुरस्कार प्रदान
कुसमोड येथील कैलास घोंगडे या शेतकऱ्याच्या गाईवर तरसाच्या हल्लयात गाईचा मृत्यू
येळावीत रक्तदान शिबिरास युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद