पिलीव येथील अक्षय हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया करुन महिलेच्या पोटातुन काढली तब्यल साडेदहा किलोची गाठ

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
पिलीव

माळशिरस तालुक्यातील पिलीव येथील नामांकीत अक्षय हॉस्पिटल सध्या पिलीव परीसरातील सर्वसामान्य नागरिकांना वरदान ठरत आहे कारण शहरामध्ये जाऊन लाखो रुपये खर्च करून शस्त्रक्रिया केल्या जातात त्याच शस्त्रक्रिया पिलीव येथे डॉ तुषार गुळभिले व डॉ सायना गुळभिले करीत असल्याने याचा पिलीव परीसरातील गोरगरीब रुग्णाला चांगला लाभ होऊ लागला आहे.

नुकतीच पिलीव येथील एक गरीब महीला हॉस्पिटल मध्ये एक- दीड वर्षापासून पोटदुखीचा त्रास आहे म्हणून हॉस्पिटल मध्ये आली.डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर सदर महिलेच्या पोटात गाठ असल्याचे निष्पण झाले. सर्व तपासण्या पुर्ण झाल्यावर डॉक्टरांनी सदर महीलेला गाठ काढण्यासाठी शस्त्रक्रिया करावी लागेल असे सांगितले.सदरचा निर्णय महिलेच्या नातेवाईकांना सांगीतला यानंतर नातेवाईकांनी शस्त्रक्रिया करण्यासाठी होकार दर्शवला.

सदरच्या महिलेच्या पतीचे निधन झाले आहे.अत्यंत हलाखीची आर्थीक परिस्थिती पण डॉक्टरांनी तुम्ही पैशांचा अजिबात विचार करू नका तुम्हाला गाठ काढायची आहे का असे विचारले असता महीलेने व नातेवाईकांनी होकार दिल्यानंतर डॉ.तुषार व डॉ.सौ.सायना गुळभिले या दोघांनी तब्बल सव्वा दोन तास अवघड असलेली शस्त्रक्रिया करुन महिलेच्या पोटातुन साडे दहा किलोची गाठ काढली.सदर महिला रुग्णाची तब्येत एकदम ठणठणीत असुन सर्व चाचण्या एकदम चांगल्या आल्या आहेत.

तो पेशंट सध्या घरी आहे.शहरात जाऊन लाखो रुपये खर्च करून शस्त्रक्रिया करणे शक्य नसताना डॉ.तुषार गुळभिले व सायना गुळभिले यांनी एका गरीब पेशंटची एकदम अवघड शस्त्रक्रिया करुन साडेदहा किलोची गाठ काढुन सर्व सामान्य, पती नसणाऱ्या महीलेला जिवदान दिल्यामुळे माळशिरस तालुक्यासह पिलीव परीसरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून डॉक्टर सायना व तुषार गुळभिले यांचे कौतुक होत आहे.

आर्थीक परिस्थिती हलाखीच्या असणाऱ्या पेशंटला आम्ही अवघड असलेली शस्त्रक्रिया करुन जिवदान दिले याचा आम्हाला मनस्वी आनंद आहे. यापुढेही आपण पिलीव परीसरातील सर्व सामान्य नागरिकांना चांगली सेवा देण्यास कटीबद्ध आहोत.
डॉ.तुषार गुळभिले,पिलीव