मुख्तार मणियार/ औसा ,प्रतिनिधी:
औसा तालुक्यातील उजनी येथील रोडवरील चार दुकाने अज्ञात चोरट्यांनी फोडून एक लाख,३४ हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना गुरुवार दि.१३ ऑगस्ट २०२० रोजी सकाळी उघडकीस आली.
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३६१ येथून राधानगर भागाकडे जाणा-या रस्त्याच्या कडेचे महाराष्ट्र मेडिकल,श्री.कलेक्शन,तुळजाई मोबाईल्स व कोहीनूर बारमध्ये बुधवारी दि. १२ अॉगस्टच्या मध्यरात्रीच्या सुमारास लोखंडी शटर वाकवून चोरी झाल्याचे उघडकीस आले.यामध्ये महाराष्ट्र मेडिकल मधील एक लाख पाच हजार रुपये,श्री.कलेक्शनच्या कापड दुकानातील १५ हजार रुपये,तुळजाई मोबाईल दुकानातील ५ हजार रुपये,नऊशे रुपयांचे मोबाईल व उपकरणे आणि कोहीनूर बारमधील आठ हजार सहाशे रुपयांची विदेशी दारू असा एकूण एक लाख ३४ हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेल्याची माहिती पोलिसांनी दिली.याबाबत भादा पोलिस ठाण्यामध्ये अनोळखी चोराविरूध्द गुन्हा नोंद करण्यात आला.तपास पोलिस निरीक्षक मुळीक करीत आहेत.


संबंधित बातम्या
मटण खायला घालत नाही म्हणून मुलाने केला बापाचा खून
कॅम्पमध्ये गुन्हेगाराचा खून
पिलीव गावात एकाच रात्री चार घरफोड्या