अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणा-या दोन्ही आरोपींना सुनावली फाशी!


सुभाष मोरे,बुलढाणा/ प्रतिनिधी:

बुलडाणा जिल्ह्यातील एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी दोन्ही आरोपींना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली.
२६ एप्रिल, २०१९ रोजी अल्पवयीन  मुलीला रात्री झोपेत असताना उचलून नेऊन तिच्यावर बलात्कार केल्याची घटना घडली होती. याबाबतची फिर्याद पीडित मुलीच्या वडिलांनी नजीकच्या पोलिस ठाण्यात दिली होती.यावरून आरोपी सागर विश्वनाथ बोरकर व निखिल शिवाजी गोलाईत यांच्या विरुद्ध दोषारोपपत्र दाखल केले होते.या घटनेचे सर्वत्र तीव्र पडसाद उमटले होते.सर्व साक्षी पुरावे सुसंगत ठरल्याने दोन्ही गुन्हेगारांना विविध कलमान्वये दोषी ठरवून १३ आॅगस्ट रोजी फाशीची शिक्षा सुनावण्यात आली.याप्रकरणी फिर्यादी पक्षातर्फे सरकारी वकील अॅड.वसंत भटकर व अॅड.सोनाली सावजी यांनी काम पाहिले.यामध्ये पोलिसांची भूमिका महत्त्वाची ठरली. निकालाचे सर्व स्तरातून स्वागत केले जात आहे.