
प्रकल्प अधिकारी, बळीराजा फौंडेशन
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
आटपाडी
बळीराजा फौंडेशन यांच्या वतीने जि.प. शाळा नं 2 खरसुंडी ता-आटपाडी जिल्हा -सांगली येथे ‘रक्तक्षय मुक्त शाळा’ व स्वच्छता शिबीर घेण्यात आले.
या शिबिरात हात कसे धुवावे याचे प्रत्येक्षिक प्रकल्प अधिकारी श्री. शशिकांत शिंदे यांनी करून दाखवले व ‘रक्तक्षय मुक्त शाळा ‘ही कशी महत्वाची आहे ह्याबाबत खुप चर्चा झाली ह्या मध्ये मुलींचे रक्त तपासणी करून त्यांचे रक्तगट व हेमोग्लोबीन तपासून त्याच्यावर नव्वद दिवस निरीक्षण करून रक्तवाढवण्यासाठी विविध प्रयोग करून मुलींचे रक्त वाढवायचा संकल्प व नियोजन केले आहे, ह्यामध्ये आहाराचा दर्जा, पालेभाज्या, लोहाचे प्रमाण वाढवण्यासाठी लोखंडी भाड्यांचा वापर तसेच परसबाग तयार करण्याचा निश्चय शाळाव्यवस्थापन कमिटीने केल्याने गावात परसबागा वाढतील असा विश्वास सरपंच धोंडीराम इंगवले यांनी व्यक्त केला आहे, आता शाळा आणी लगेचच गाव यासाठी पुढाकार घेईल असे ग्राम. पं. सदस्य किरण पुजारी यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले, पुढील काही दिवसात शाळा, गाव व बळीराजा फौंडेशन हे विशेषतः ‘रक्तक्षय मुक्त शाळा ‘ ही संकल्पना राबवणार आहे याबाबत चर्चा अंती शाळेचे मुख्याध्यापक श्री. कांबळे सर यांनी सांगितले.
या शिबिरात उपस्थित
खरसुंडी गावाचे लोकनियुक्त सरपंच
धोंडीराम इंगवले.ग्रा. पं. सदस्य किरण पुजारी
बळीराजा फौंडेशन चे अध्यक्ष
भाई शिवराम मासाळ.
तसेच रक्तक्षय मुक्त शाळा या प्रकल्पचे अधिकारी श्री. शशिकांत शिंदे.
प्रकल्प समन्वयक -प्रवीण ऐवळे
प्रकल्प समन्वयक -साहिल वाघमारे
जि. प. शाळा नं 2 चे मुख्यध्यापक प्रकाश कांबळे सर व सर्व शिक्षक स्टाफ उपस्तित होते.

संबंधित बातम्या
प्रवीण बागड़े यांना माफसूचा उत्कृष्ट अधिकारी पुरस्कार प्रदान
कुसमोड येथील कैलास घोंगडे या शेतकऱ्याच्या गाईवर तरसाच्या हल्लयात गाईचा मृत्यू
येळावीत रक्तदान शिबिरास युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद