आटपाडी येथे अर्थक्रांती ज्येष्ठ नागरिकांची कार्यशाळा संपन्न

आटपाडी तालुका विधी सेवा समिती व पंचायत समितीतर्फे आयोजन
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/आटपाडी
आटपाडी तालुका विधी सेवा समिती व पंचायत समिती आटपाडी यांच्यावतीने ज्येष्ठ नागरिकांसाठी विविध प्रकारच्या लाभाच्या योजना तसेच त्यांना समाजामध्ये जीवन जगत असताना कायदा व सुव्यवस्था याच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांचे जीवन सुखी, समृद्ध व आनंददायी, सुखकर कसे होईल याबाबत मार्गदर्शन पर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.अर्थक्रांती ज्येष्ठ नागरिक संघटनेच्या पदाधिकारी व सभासदांचा कार्यशाळेत समावेश होता.
सदर कार्यशाळेमध्ये तालुका विधी समितीचे सदस्य तथा सचिव ॲड.एन.एम.दबडे, सदस्य ॲड.डी.एस.पाटील,ॲड. अनघा कुलकर्णी,अध्यक्षा आटपाडी बार असोसिएशन, ॲड.निवास पाटील, अर्थक्रांती ज्येष्ठ नागरिक संघटनेचे सांगली जिल्हाध्यक्ष जगन्नाथ मोरे पाटील,पंचायत समिती आटपाडीचे सहाय्यक गटविकास अधिकारी सचिन भोसले, समग्र शिक्षा लेखाधिकारी प्रशांत चंदनशिवे,ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी देशमुख, सचिन फोंडे, अधीक्षक पंचायत समिती आटपाडी व ज्येष्ठ नागरिक व महिला उपस्थित होत्या.
यावेळी जेष्ठ नागरिकांनी जीवन जगत असताना सन्मानाने जीवन जगता यावी यासाठी कायद्याची सोबत व ज्येष्ठ नागरिक ऍक्ट 2007 अन्वये ज्येष्ठ नागरिकांना होणाऱ्या कोणत्याही अन्यायकारक बाबींसाठी वरील ॲक्टनुसार ज्येष्ठांना संरक्षण व सन्मानाची वागणूक मिळू शकते असे प्रतिपादन सौ अनघा कुलकर्णी मॅडम यांनी केले
जिल्हाध्यक्ष आदरणीय श्री जगन्नाथ मोरे पाटील साहेब यांनीमोरे पाटील साहेब त्याचबरोबर पंचायत समिती आटपाडीचे सहाय्यक गटविकास अधिकारी सचिन भोसले साहेब समग्र शिक्षा लेखाधिकारी श्री प्रशांत चंदनशिवे साहेब त्याचबरोबर सन्माननीय तालुका ज्येष्ठ नागरिक संघटनेचे अध्यक्ष देशमुख काका अरविंद चांडवले काका तसेच ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी देशमुख, अर्थक्रांती ज्येष्ठ नागरिक संघटनेचे चंद्रशेखर मोरे, रामभाऊ जाधव, सुबराव पाटील, तालुका अध्यक्ष व्ही.एन.देशमुख,संघटक व सल्लागार अरविंद चांडवले, उपाध्यक्ष नंदकुमार राक्षे, दत्तात्रय मोकाशी, डी.एम.पाटील, आप्पासाहेब काळेबाग,पांडुरंग मेजर,भास्कर गायकवाड, आनंदराव गायकवाड,आप्पासाहेब गायकवाड, बाळासाहेब गायकवाड,न्यायालयीन कर्मचारी सलमान शेख,भाऊसाहेब दिनकर बारवकर, पांडुरंग ऐवळे,महादेव कोळी, सौ. गुलशन वंजारी,श्रीमती विजया चांडवले, ज्येष्ठ नागरिक व महिला उपस्थित होत्या.
यावेळी जेष्ठ नागरिकांना जीवन जगत असताना सन्मानाने जीवन जगता यावे यासाठी कायद्याची सोबत व ज्येष्ठ नागरिक ऍक्ट २००७ अन्वये ज्येष्ठ नागरिकांना होणाऱ्या कोणत्याही अन्यायकारक बाबींसाठी वरील ॲक्टनुसार ज्येष्ठांना संरक्षण व सन्मानाची वागणूक मिळू शकते, असे प्रतिपादन सौ.अनघा कुलकर्णी यांनी केले.
अर्थक्रांती ज्येष्ठ नागरिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष जगन्नाथ मोरे पाटील यांनी ज्येष्ठ नागरिक सन्मान मानधन योजनेअंतर्गत ज्यांचे वय वर्ष ६५ वर्षे पूर्ण आहे,अशा सर्व ज्येष्ठ नागरिकांसाठी दरमहा दहा हजार रुपये सन्मान मानधन ही योजना सुरू करणार असलेबाबतचा प्रस्ताव मंत्रालयात सादर केला असल्याचे सांगितले. याबरोबर त्यांनी आणखी चार प्रमुख मागण्यासुद्धा मान्यतेस्तव शासनाकडे सादर केले असल्याचे प्रतिपादन केले. यावेळी त्यांनी ज्येष्ठ नागरिकांकरिता विविध योजना, ज्येष्ठ नागरिकांनी अनुभवाच्या आधारे तरुणांना सक्षम भारत देश घडवण्यासाठी मार्गदर्शकाच्या भूमिकेत राहून कार्य सुरू ठेवणार असल्याचे प्रतिपादन केले.
यावेळी उपस्थित ज्येष्ठ नागरिक व मंचावर उपस्थित अधिकारी यांच्यामध्ये चर्चात्मक स्वरूपात संवाद होऊन एका नव्या पर्वाची सुरुवात झाली. यावेळी समग्र शिक्षाचे लेखाधिकारी चंदनशिवे यांनी ज्येष्ठ नागरिक यांना यापुढे जीवन जगत असताना कोणत्याही अडचणी आल्या तर तालुका विधी सेवा समितीच्या माध्यमातून प्राधान्याने सोडवण्यात येतील. यासाठी सदर समिती प्रयत्नशील असून वडीलधारी मंडळींनी घाबरून जाण्याचे कारण नाही,असे प्रतिपादन केले.
जिल्हाध्यक्ष जगन्नाथ मोरे पाटील यांना पंचायत समिती आटपाडीच्या वतीने ज्येष्ठांच्या प्रमुख पाच मागण्यांबाबत पंचायत समितीमार्फत जाहीर पाठिंबा असल्याचे लेखी पत्र सुपूर्द करण्यात आले. कार्यक्रमाचे आभार तालुका ज्येष्ठ नागरिक संघटनेचे संघटक सल्लागार अरविंद सांडवले मानले.यावेळी तालुक्यासह जिल्ह्यातीलही ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.