घाणंद येथे महाआरोग्य मोफत तपासणी व रक्तदान शिबीर संपन्न

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/आटपाडी:
घाणंद येथे श्री.सिद्धनाथ यात्रा व हनुमान उत्सवानिमित्त स्व.आण्णा कटरे (सावकार) मेमोरियल संचलित स्पंदन हॉस्पिटल सांगली यांचेतर्फे परिसरातील कष्टकरी,कामगार, शेतकरी व शेतमजूर वर्गासाठी महाआरोग्य मोफत तपासणी शिबीर व रक्तदान शिबीर पार पडले.सरपंच किसन कटरे यांच्याहस्ते शिबीराचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी उपसरपंच धनाजी जुगदर,माजी सरपंच पांडुरंग कटरे, ज्ञानू कदम सर,ग्रामपंचायत सदस्य कुंडलिक कटरे, बंडू कदम, सिद्धार्थ कटरे सर,विष्णूआबा जुगदर आदी उपस्थित होते.
डॉ.आप्पा कटरे, डॉ.सौ.रसिका कटरे, डॉ.सचिन गावडे,डॉ. अनिकेत हजारे,डॉ.वसंत बुर्ले, डॉ.सौ.मयुरी बुर्ले, डॉ.हर्षल माने,डॉ.प्रशांत महिंद, डॉ.आण्णा काबुगडे,डॉ.निखिल चव्हाण,डॉ.कैलास कदम,डॉ.शिंगाडे तसेच ज्ञानदेव कटरे व मलकारी बिराजदार या तज्ञ डॉक्टर्संनी तपासण्या केल्या.
माजी सरपंच पांडुरंग कटरे तसेच त्यांचे बंधू डॉ. आप्पासाहेब कटरे व डॉ.सौ.रसिका कटरे यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा घाणंद येथे या कार्यक्रमाचे आयोजन केले.या शिबीरास परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.