
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/आटपाडी
आटपाडी तालुक्याचे माजी उपसभापती,लोकनेते कै.पै.आण्णासाहेब श्रावणा रणदिवे(तात्या) यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त त्यांच्या नावाने देण्यात येणारा समाजभूषण पुरस्कार सामाजिक कार्यकर्ते व बळीराजा फाउंडेशनचे अध्यक्ष भाई शिवराम मासाळ यांना प्रदान करण्यात आला. यंदाचा पुरस्कार देताना भाई शिवराम मासाळ यांनी अंधश्रद्धा निर्मूलनासाठी केलेले काम, महिलांच्या आरोग्याच्याबाबत करत असलेले जनजागृती, पशुसंवर्धनासाठी करत असलेले काम, संविधान जागृती मोहीम, जलबचत व संवर्धन तसेच भटक्या समूहात जनजागृती अशा विविध अंगाने करत असलेल्या कामाची दखल घेऊन निवड समितीने मासाळ यांच्या कार्याचा गौरव केला. आटपाडी खानापूर तालुक्याचे माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. विटा नगरीचे माजी नगराध्यक्ष वैभवदादा पाटील,भारततात्या पाटील,भगवानआप्पा मोरे, माजी जिल्हा परिषद सदस्य जनार्धन झिंबल, वंचित बहुजन आघाडीचे नेते अरुणभाऊ वाघमारे,सावंतामामा पुसावळे, रवींद्रनाना भिंगारदेवे व इतर मान्यवर उपस्थित होते.

संबंधित बातम्या
प्रवीण बागड़े यांना माफसूचा उत्कृष्ट अधिकारी पुरस्कार प्रदान
कुसमोड येथील कैलास घोंगडे या शेतकऱ्याच्या गाईवर तरसाच्या हल्लयात गाईचा मृत्यू
येळावीत रक्तदान शिबिरास युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद